रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल च्या अध्यक्षपदी विशाल तोंडचिरकर तर सचिवपदी कीर्ती कांबळे यांची निवड
उदगीर : येथील रोटरी क्लब उदगीर सेंटरच्या सन 2020 21 या रोटरी वर्षासाठी अध्यक्षपदी रोटेरियन विशाल राजेंद्र तोंडचिरकर तर सचिवपदी कीर्ती दीपक कांबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
उपाध्यक्ष पदी प्रशांत मंगुळकर यांची तर कोषाध्यक्ष म्हणून ॲड. मंगेश साबणे व क्लब ट्रेनर म्हणून विशाल जैन यांची निवड करण्यात आली आहे यावेळी क्लब ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून ज्योती चौधरी, क्लब मेंबरशिप डायरेक्टर म्हणून संतोष फुलारी, ह्युमन डेव्हलपमेंट डायरेक्टर म्हणून डॉ. यशोधन सताळकर, इंटरनॅशनल सर्विस डायरेक्टर ज्योती डोळे, न्यू जनरेशन डायरेक्टर चंद्रकांत ममदापुरे, पब्लिक इमेज डायरेक्टर व्यंकटराव कणसे, लिटरसी डायरेक्टर भागवत केंद्रे, विन्स डायरेक्टर महानंदा सोनटक्के, डिस्ट्रिक्ट समन्वय डायरेक्टर मंगला विश्वनाथे रोटरी इंटरनॅशनल समन्वयडायरेक्टर सरस्वती चौधरी, रोटरी फाउंडेशन डायरेक्टर विजयकुमार पारसेवार, बुलेटीन एडिटर डॉक्टर मोहन वाघमारे व सार्जंट म्हणून मनोज खत्री यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.
नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
addComments
टिप्पणी पोस्ट करा