*लातूर 91 स्वाबपैकी 71 निगेटिव्ह, 10 पॉझिटिव्ह तर 10 अनिर्णित* *आज उदगीर येथील 4 व लातूर येथील 3 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी*

*लातूर 91 स्वाबपैकी 71 निगेटिव्ह, 10 पॉझिटिव्ह तर 10 अनिर्णित*


 


*आज उदगीर येथील 4 व लातूर येथील 3 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी*


 


*जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 75, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 158, मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13*


 


लातूर:- आज दिनांक 23 जून 2020 रोजी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातून 91 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यापैकी 91 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह, 10 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर 10 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आलेले आहेत.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तींचे स्वाब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 20 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह( पूर्वीचाच रुग्ण) आला असून 02 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आले आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेली व्यक्ती या संस्थेच्या रुग्णालयात दाखल होती 14 दिवसानंतर पुनर्तपासणी केली असता त्या व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे . *(आज या संस्थेतील नवीन एकाही व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही)*


महानगरपालिकेकडून 18 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 14 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 04 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. *पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या 2 व्यक्ती भोई गल्ली व 2 व्यक्ती दयाराम रोड कुरेशी गल्ली लातूर येथील आहेत. 1 पॉझिटीव्ह व्यक्ती पोलीस प्रशिक्षण केंद्र बाभळगाव, 1 पॉझिटिव्ह व्यक्ती नागोरे मंगल कार्यालय उदगीर, 1 पॉझिटिव्ह व्यक्ती अंधोरी तालुका औसा, 1 पॉझिटिव व्यक्ती माळकोंडजी तालुका औसा तर 2 पॉझिटिव व्यक्ती कालंग गल्ली औसा* असे एकूण आज जिल्ह्यात 10 व्यक्तींचे आवहल पॉझिटिव आलेले आहेत, अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे.


 


*आज रुग्णालयातून 7 रुग्णांना सुट्टी*


आज उदगीर उपजिल्हा रुग्णालयातून विकास नगर येथील चार रुग्णांना प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली तर लातूर येथील 1000 मुला मुलींचे वस्तीगृह येथील कोविड केअर सेंटर मधून चौधरी नगर 2 व बाभळगाव येथील 1 असे एकूण तीन रुग्णांना सुट्टी देण्यात आली. याप्रमाणे लातूर जिल्ह्यातून आज 7 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 75, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 158 मृत्यू तर झालेल्या रुग्णांची संख्या 13 इतकी आहे, अशी माहिती डॉ. ढगे यांनी दिली आहे.


Popular posts
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image