दिव्यांगासाठी लातूर जि. प.ला केंद्र सरकारकडून आठ कोटींचा निधी माजी मंञी निलंगेकरांचे सहकार्य:  दिव्यांगाला घरपोच कृत्रिम अवयवाचे वाटप व्हावे : अध्यक्ष राहुल केंद्रे

दिव्यांगासाठी लातूर जि. प.ला केंद्र सरकारकडून आठ कोटींचा निधी


माजी मंञी निलंगेकरांचे सहकार्य: 


दिव्यांगाला घरपोच कृत्रिम अवयवाचे वाटप व्हावे : अध्यक्ष राहुल केंद्रे


लातूर : केंद्रसरकारच्या वतीने दिव्यांग व्यक्तींना कृञीम अवयव वाटप करण्यासाठी ८ कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून जिल्ह्याचे माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर व लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रयत्नातून हा निधी आला आहे, अशी माहिती लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी दिली.


हा निधी वितरित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी सर्व गटविकास अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगाला घरपोच कृञीम अवयवाचे वाटप झाले पाहिजे आशा सुचना संबधित आधिकार्‍यांना दिल्या. एक ही दिव्यांग या लाभापासुन वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचीही सूचना दिली.


केंद्रशासनाच्या दिव्यांग योजनेअंतर्गत भारतातील फक्त दोनच जिल्हयांना निधी मिळाला असून त्यातील महाराष्ट्रातील एकमेव लातुर जिल्हयाची निवड झाली तर दुसरा जिल्हा हा उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथील जिल्हा परिषद आहे. हा निधी मिळविण्यासाठी लातुरचे माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर व लातुरचे खासदार सुधाकर शृंगारे याच्या प्रयत्नामूळेच हा ८ कोटी रुपयाचा निधी लातुर जिल्हयाला मिळाला आहे. राज्यातील एकमेव जिल्हातिल दिव्यांगाना कृञीम अवयव वाटपाचा निधी मिळण्याचा बहुमान लातुर जिल्हापरिषदेला माजी पालकमंञी संभाजी पाटील निलंगेकर व खासदार सुधाकर शृंगारे यांच्यामूळे मिळाला आहे आसे जिल्हापरिषद अध्यक्ष राहुल केंद्रे म्हणाले. जिल्हाभरातील दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव त्यांच्या घरपोच पुरवठा करण्यासाठीचे नियोजन करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.त्यावेळी बोलत होते. संवेदना आँप च्यामाध्यमातुन


सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार, दिव्यांग जन सशक्तिकरण विभाग, भारत सरकार अंगीकृत अलिमको, समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद लातूर, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र लातूर यांच्या वतीने 21 डिसेंबर 2019 ते 7 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये तालुकानिहाय दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम अवयव साहित्याचे वाटप करण्यासाठी शिबिर घेण्यात झाले होते. त्या शिबिरामध्ये पात्र असणाऱ्या 8797 दिव्यांग व्यक्तींना मोटार ट्रायसिकल, व्हीलचेअर, कुबड्या, कानाचे मशीन, काठी, वाकर इत्यादी साहित्य दिव्यांगांना घरपोच देण्यासाठीच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन आज जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आली. या बैठकिला जिल्हयातिल सर्व तालुक्याच्या गटविस्ताराधिकार्‍या सोबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी चर्चा केली. वेळी या बैठकीला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ.भारतबाई साळुंके, जिल्हा समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे, कृषी व पशुसंवर्धन सभापती गोविंद चिलकुरे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी खमितकर, जिल्हा शिक्षण अधिकारी जामदार, संपूर्ण जिल्ह्यातील दहा तालुक्याचे गट विकास अधिकारी यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


Popular posts
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image