देवणीच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याची गरज : विजयकुमार मानकरी

देवणीच्या विकासासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याची गरज : विजयकुमार मानकरी


देवणी : देवणी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाकडून लाखो रुपयांचा निधी येत असला तरी शहरात विविध कामसंदर्भात ज्या एजन्सीला कामे दिली आहेत त्या यंत्रणेकडून सदरची सर्व कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे केली जात आहेत असा आरोप करीत सत्ता कोणत्या पक्षाची का असेना देवणीच्या सर्वांगीण विकासासाठी होणारी कामे सर्वच पक्षाचे राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र यावेत, व शहरातील सर्वच कामे दर्जेदार व्हावीत असे मत काँग्रेसचे युवा नेते विजयकुमार मानकरी यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले


गेली चार पाच वर्षांपासून देवणी नगर पंचायत मध्ये सत्ताधारी पक्षाची एक हाती सत्ताआहे. या काळात देवणी शहराचा म्हणावा तेवढा विकास झाला नाही. जी कामे झाली ती अतिशय निकृष्ट दर्जाचे झाली आहेत. यासंदर्भात कोणत्याच पक्षाने आवाज उठवला नाही. जे कामे कांग्रेस पक्षाच्या काळात झाली अतिशय उत्तम प्रतीची झाली असून सध्याच्या सत्ताधारी पक्षाने लाखो रुपये खर्च करूनही चांगल्या प्रतीचे कामे होत नाहीत. विकासाची कामे ही परत परत होत नाहीत, या निकृष्ट दर्जाच्या कामसंदर्भात आवाज उठवून देवणीच्या विकासाची कामे दर्जेदार झाली पाहिजे परंतु तसे होताना दिसत नाही अशी खंत यावेळी युवा नेते विजयकुमार मानकरी यांनी व्यक्त केली.


देवणी शहरात जी कामे झाली आहेत, त्यात केवळ कार्यकर्ते सांभाळण्याचा प्रकार असून देवणीत झालेल्या कामाला दर्जाचं नाही असा आरोप करीत देवणी चा विकास करणे सर्वच राजकीय पक्षांची सामाजिक बांधिलकी आहे, परंतु तसे होताना दिसत नाही अशी खंतही मानकरी यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाकडून येणारा निधी वाया जात आहे, या निधीचा विनियोग चांगल्या प्रकारे व्हावा. शहरातील कामे चांगल्या दर्जाची व्हावीत असे मत युवा नेते विजयकुमार मानकरी यांनी यावेळी व्यक्त केले. 


 


 


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
*राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' बुधवारी उदगीरात....*
इमेज