पशुपालकांनी गायी म्हशीची नोंदणी करण्यासाठी अर्ज करावेत

पशुपालकांनी गायी म्हशीची नोंदणी करण्यासाठी अर्ज करावेत


लातूर:- राज्यातील गायी व म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक अनुवंशिक सुधारणा कार्यक्रमांतर्गत लाभ घेण्यासाठी पशुपालकांनी 30 जून 2020 पर्यंत अर्ज करावेत असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


राज्यातील गायी/ म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सदरील कार्यक्रम राबविला जात आहे. पशुपालकांनी जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेशी संपर्क साधुन जातीवंत गायी व म्हशींचे अर्ज भरुन घ्यावेत. जास्तीत जास्त पशुपालकांनी या योजनेसाठी अर्ज करावेत. असे आवाहन डॉ. बी.यु. बोधनकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद लातूर व डॉ. केंडे एस.एस. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त लातूर यांनी केले आहे.