भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कायदेशीर नोटीस भरत चामले यांची पत्रकार परिषद

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना कायदेशीर नोटीस


भरत चामले यांची पत्रकार परिषद


उदगीर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विरोधात आपत्तीजनक व बदनामीकारक विधान केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांना उदगीर येथील खरेदी- विक्री संघाचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी विधानसभा अध्यक्ष भरत तुकाराम चामले यांनी कायदेशीर नोटीस बजावली असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.


भाजपाचे आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर पातळी सोडून केलेली टीका सूर्यावर थुंकण्यासारखे असून पडळकर यांनी वक्तव्ये सांभाळून करावीत. महाराष्ट्र त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असे भरत चामले पत्रकार परिषदेत म्हणाले. शरदचंद्र पवार यांच्या विषयी केलेल्या विधानासंदर्भात पडळकर यांनी विनाअट जाहीर माफी मागावी अन्यथा बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची कायदेशीर नोटीस अड. बी. एन. बोळे यांच्यामार्फत चामले यांनी दिले आहे.