भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी मधुमती कनशेट्टे

भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी मधुमती कनशेट्टे


उदगीर : उदगीर शहर भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी मधुमती कनशेट्टे यांची निवड करण्यात आली आहे.


मधुमती कनशेट्टे या गेल्या अनेक वर्षापासून भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून काम करीत आहेत. मागच्या काळात पक्षकार्यात त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेवून पक्षाचे 


माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, जिल्हाध्यक्ष रमेश कराड, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे, उपाध्यक्ष सुधीर भोसले, भगवानराव पाटील तळेगावकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष बापूराव राठोड, तालुकाध्यक्ष बस्वराज रोडगे, प्रा. पंडित सूर्यवंशी, बालाजी गवारे, महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा उत्तरा कलबुर्गे, यांच्या सूचनेवरून शहराध्यक्ष उदयसिंह ठाकूर यांनी नियुक्ती केली आहे.


पक्षाचे विचार समाजातील तळागाळात पोहोचवावे, या अपेक्षेसह जास्तीत जास्त महिलांचे संघटन करून पक्षवाढीसाठी काम करावे असे आवाहन मधुमती कनशेट्टे यांना दिलेल्या पत्रातून केले आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.


मधुमती कणशेट्टे यांना नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बापूराव राठोड, सुधीर भोसले, उत्तरा कलबुर्गे, नगरसेवक मनोज पुदाले, बापूराव यलमटे, ऍड. दत्ताजी पाटील, ऍड. सावन पस्तापुरे, गणेश गायकवाड, आनंद बुंदे, आनंद साबणे, शंन्नो शेख, उषा माने, जया काबरा यांची उपस्थिती होती.


टिप्पण्या
Popular posts
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज