फादर्स डेच्या दिवशीच मुलांकडून जन्मदात्या पित्याचा खून

फादर्स डेच्या दिवशीच मुलांकडून जन्मदात्या पित्याचा खून


निलंगा : आज फादर्स डे दिवशीच निलंगा तालुक्यात मुलाने बापाचा खून केल्याची घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची चर्चा आहे.


निलंगा तालुक्यातील भोसलेवाडी या गावात पंचप्पा धुप्पाधुळे यांची वडिलोपार्जित शेत जमीन आहे. पावसाने चांगली साथ दिल्यामुळे त्यांनी पेरणी सुरू केली. या शेत जमिनीचा वाद आहे. त्याचा मुलगा नागनाथ यांचा वडिलांशी वाद होता. वडिलांनी पेरणी सुरू केली याचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्याचे वडिलांशी भांडण झालं. या वादात नागनाथ याची मुले बायको आणि मेव्हणे यांनीही साथ दिली. नागनाथ याने लोखंडी रॉडने जबर मारहाण केली. यात पंचप्पा यांचा मृत्यू झाला आहे. हे भांडण सोडविण्यास गेलेल्या चार जणांना जबर मार बसला आहे. जखमींवर निलंगा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बाबत निलंगा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेतील सर्व आरोपी फरार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.