लग्न समारंभ मंगल कार्यालयामध्ये करण्यास पन्नास व्यक्ति संख्येच्या मर्यादेत परवानगी

लग्न समारंभ मंगल कार्यालयामध्ये करण्यास पन्नास व्यक्ति संख्येच्या मर्यादेत परवानगी


 


लातूर:- जिल्हयात कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष जी. श्रीकांत यांनी लातूर जिल्हयात लग्न समारंभ मंगल कार्यालयामध्ये (Function Haal) पन्नास व्यक्ति संख्येच्या मर्यादेत आयोजित करण्यास परवानगी देत असल्याचे आदेश जारी केले आहेत.


लग्न समारंभाकरीता वेगळी विशेष परवानगी घेण्याची आवश्यकता नाही.मंगल कार्यालयात लग्न समारंभ आयोजित करीत असताना लॉकडाऊन व शारिरीक अंतर (Physical Distence) च्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तथापि मंगल कार्यालयात लग्न सोहळयात कोणत्याही परिस्थितीत पंन्नास पेक्षा जास्त नियमित व्यक्ति उपस्थित असल्याचे निर्दशनास आल्यास आयोजकाविरुध्द / मंगल कार्यालय मालकाविरुध्द सक्त कायदेशिर कारवाई करण्यात येईल याची गांर्भीयाने नोंद घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले आहे.


या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निर्दशनास आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ,55 तसेच साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 अन्वये दिलेल्या तरतूदीनुसार भारतीय दंडसंहिता 1860 चे कलम 188 नुसार तसेच महाराष्ट्र कोवीड - 19 उपाययोजना नियम 2020 च्या तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल याची दक्षता घ्यावी असे ही आदेशात नमुद केले आहे.


टिप्पण्या
Popular posts
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
*जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आशिवार्द द्या : क्रीडा मंत्री संजय बनसोडे*
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज