रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व धन्वंतरी आयुर्वेदिक कॉलेजच्या वतीने वनौषधी लागवड
उदगीर:- रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड चॅरिटेबल हॉस्पिटल,उदगीर येथे कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक व वैयक्तिक अंतर राखून वनौषधी उद्यानामध्ये जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार दि.१८ जुन २०२० रोजी अतिरिक्त जिल्हाधिकारी डाॅ.अरविंद लोखंडे यांच्या शुभहस्ते औषधी लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रो.डॉ.दत्तात्रय वि.पाटील हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मानद सदस्य रमेशअण्णा अंबरखाने,सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय पवार,प्रोजेक्ट चेअरमन रो.डाॅ.एस.आर.श्रीगिरे,डाॅ.आश्रुबा जाधव,डाॅ.स॔दीप मुसणे, डाॅ.सत्तारी, डाॅ.मनोहर सुयॆवंशी,डाॅ.मल्लिकार्जुन बिरादार हे उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना डाॅ.लोखंडे म्हणाले की वनौषधींची लागवड-संरक्षण-संवर्धन हे जैवविविधतेचे संतुलन स्वच्छ परिसर,हारीत परिसर व सुंदर परिसर संकल्पनेवर आधारित आहे.कोरोना विषाणू संसर्गाच्या व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तुलसी, अडुळसा, अश्वगंधा, हरिद्रा यासारख्या विविध औषधी रोगप्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
यावेळी धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व आंतरवासियता प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा