कोरोना योद्धा असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव: शहाजी पाटील यांचा पुढाकार: आमदार निलंगेकर यांचा वाढदिवस

कोरोना योद्धा असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा गौरव:


शहाजी पाटील यांचा पुढाकार: आमदार निलंगेकर यांचा वाढदिवस


उदगीर: कोरोणाच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता शहर स्वच्छ व सुंदर ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा भाजपाचे युवा नेते शहाजी पाटील तळेगावकर यांच्या पुढाकारातून माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौरव करण्यात आला.


माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त हार न घालता कोरोना योद्धांचा सन्मान करून माझा वाढदिवस साजरा करावा असे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत उदगीर येथील भाजपाचे युवानेते शहाजी पाटील तळेगावकर यांनी उदगीर शहरातील सफाई विभागातील c झोन मधल्या कर्मचारी या करोना संकटाच्या काळात ज्यांनी स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याचा धोका पत्करून आपल्यासाठी अविरत कार्यरत असलेल्या कोरोना योद्ध्यांचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. याप्रसंगी या सर्व करोना योद्ध्यांना, महिलांना साडी पुरुषांना एक भेटवस्तू पुष्पहार व अल्प उपहार व भारत सरकारच्या आयुष्य मंत्रालयाने शिफारस केलेले होमिओपॅथिक औषध आर्सेनिक अल्बम 30 देऊन त्यांचा सत्कार करून वाढदिवस साजरा केला. 


यावेळी भगवानराव पाटील तळेगावकर, प्रतिभाताई पाटील, तानाजी पाटील , शहाजी पाटील, नगरसेविका श्रद्धा पाटील व पाटील परिवाराच्या वतीने कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.