ग्रीन आर्मीच्या कामाला पाठबळ देऊ : ना. संजय बनसोडे
उदगीर : पर्यावरण संवर्धनासाठी उदगीर शहरात ग्रीन आर्मीच्या माध्यमातून होत असलेले काम गौरवास्पद असून या संस्थेच्या कामाला गती देण्यासाठी आपण पाठबळ उभे करू असे आश्वासन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली.
उदगीर येथील देगलूर रोडवरील सिंचन विभागात ग्रीन आर्मी या पर्यावरणवादी संस्थेने झाडांचे संगोपन केले असून जागतिक पर्यावरण दिन व वटसावित्री पोर्णिमेनिमित ना. संजय बनसोडे यांच्या हस्ते वटवृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बोलताना ना. बनसोडे यांनी सिंचन विभागच्या जागेत लॉक डाउनच्याही काळात पाणी घालून जगवलेली झाडे पाहून ग्रीन आर्मीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. आगामी काळात हा परिसर ऑक्सिजन पार्क म्हणून ओळखला जावा अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बस्वराज पाटील नागराळकर, रमेश अंबरखाने, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, मुख्याधिकारी भारत राठोड, ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने व जलसंपदाचे अभियंता दत्तात्रय पुरी यांची प्रमुख उपस्थीती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अनिल भिकाने, व्ही.एस. कुलकर्णी, विक्रम हलकीकर, ज्ञानोबा कोटलवार,शोभाताई कोटलवार, चंद्रकलाताई बिरादार, इंजि निशांत धवलशंक, विवेक वाघ, शिवकांत निटूरे, गौरव गंडारे यानी पुढाकार घेतला.
सदरिल उपक्रमात विश्वनाथ मुडपे, देविदासराव नादरगे, डॉ महेश भातांब्रें, डॉ संजिवनी भातांब्रे, डॉ. उदय गुजलवार, सुरेखा गुजलवार, सुरेखा कुलकर्णी, सुवर्णा पटवारी, वर्षा कोटलवार, रूपाली पाटील, अर्चनाताई नळगीरकर, उषाताई तोंडचिरकर, अर्चना पैके आदीसह मोठया संख्येने महिला पुरुष सहभागी झाले.
यावेळी उपस्थित महिलांनी वडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा