शासनाकडून हत्तीबेटावर पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार                                                 -पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे

शासनाकडून हत्तीबेटावर पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी


सर्वतोपरी मदत करणार


                                                -पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे


       लातूर/उदगीर :- लातूर जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक असलेले उदगीर तालुक्यातील हत्तीबेट हे"ब"वर्गीय पर्यटन स्थळ वन विभागाच्या ताब्यात आहे. तरि वन विभागाने हत्तीबेटावर वन विकासासह पर्यटन विकासाची कामे तात्काळ सुरू करावीत. या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी राज्य शासनाकडून सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली. उदगीर तालुक्यातील हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर आजच्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.  


       यावेळी उस्मानाबाद विभागाचे विभागीय वन अधिकारी एम. आर.गायकर, सामाजिक वनीकरण अधिकारी प्रियंका गंगावणे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी,तहसीलदार व्यंकटेश मुंडे ,गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगोळे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हा परिषद सदस्या उषा रोडगे, कल्याण पाटील, शिवाजी मुळे, ज्ञानेश्वर पाटील, वनरक्षक गोविंद घुले, नामदेव डिगोळे आदी उपस्थित होते. 


      राज्यमंत्री बनसोडे यांनी हत्तीबेट गडावरील श्री. सदगुरू गंगानाथ महाराज संजीवन समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी हत्तीबेटाला ऐतिहासिक, धार्मिक व पौराणिक महत्त्व असल्याचे सांगून हत्तीबेट गडावरील संत गंगाराम बाबा संजीवन समाधीची पूजा करून दर्शन घेतले. 


यावेळी उपस्थित वन विभागाच्या अधिकाऱ्यांना या हत्तीबेट गडावर वृक्षारोपणासह ज्या ज्या सुविधा करणे शक्य आहे, विकासाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेल्या सर्व घटकांचा आराखडा तयार करून तात्काळ सादर करण्याचे निर्देश श्री. बनसोडे यांनी दिले.


     कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून पाहुण्यांचा सत्कार व आभार प्रदर्शन व्ही. एस. कुलकर्णी यांनी केले.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही