राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण:  निलंगा शरद पवार विचार मंचचा उपक्रम  

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त वृक्षारोपण: 


निलंगा शरद पवार विचार मंचचा उपक्रम



निलंगा : शरद पवार विचार मंच व राष्ट्रवादी युवक शहर निलंगा यांच्या वतीने शरद पवार विचार मंच निलंगा येथील कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २१ व्या वर्धापनदिन दिनानिमित्त सकाळी १० वाजुन १० मिनिटांनी शरद पवार विचार मंच चे तालुकाध्यक्ष सुधीर मसलगे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करुन वर्धापनदिन साजरा करण्यात आला.


वर्धापनदिनाचे औचित्य साधुन प्रदेशाध्यक्ष अमित ढमाळ यांच्या सुचनेनुसार शरद पवार विचार मंच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी निवड केल्याचे रुक्मिणी ताई कांबळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस तथा शरद पवार विचार मंच चे नेते विनायक (आण्णा) बगदुरे व तालुकाध्यक्ष सुधीर दादा मसलगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.


यावेळी शरद पवार विचार मंच चे कार्याध्यक्ष अंगद जाधव, युवक तथा विचार मंच चे शहराध्यक्ष धम्मानंद काळे माजी तालुका अध्यक्ष संदीप मोरे , महिला आघाडीच्या महादेवी पाटील, रेश्मा पटेल, लक्ष्मण क्षिरसागर, गफ्फार भाई लालटेकडे,लिगल सेलचे अँड. गोपाळ इंगळे,अँड.हरिभजन पौळ,पांडुरंग कांबळे, विद्यार्थी चे शैलेश जाधव, अभय चौधरी, सोशल मीडिया प्रदेश सरचिटणीस किरणकुमार सोळुंके, वैजनाथ चोपणे, सुरेश रोळे,पंढरी पाटिल,जीवन तेलंग, राजेश माने, मोहन माने,व्यंकट कुंभार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


शेडोळवाडी, जेवरी ,मानेजवळगा येथेही वृक्षारोपण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.


टिप्पण्या
Popular posts
*संत सेवालाल महाराजांचे वंशज महंत शेखर महाराज यांच्या उपस्थितीत बंजारा समाज बंधू-भगिनींचा आशीर्वाद महामेळावा उत्साहात संपन्न*
इमेज
डॉ. चिकमुर्गे यांचे अमृत हॉस्पिटल ठरतेय उदगीरकरांसाठी वरदान
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
दीपावलीचा मुहूर्त साधत नागरिकांच्या गाठीभेटी आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा मतदारांशी थेट संवाद
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज