तैवान मराठी मंडळा तर्फे शिवराज्याभिषेक दिन उत्सहात साजरा:
उदगीर : ६ जुन हा सुवर्ण दिवस संपूर्ण महाराष्ट्रीयांचा मनामध्ये कायमचा बिंबला आहे, याच दिवशी जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला होता. या सुवर्ण दिनाचे औचित्य साधून तैवान स्थित मराठी तरुणांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन केले.
यावेळी शिवरायांचा शूर गाथा सांगणारे पोवाडे व मंगलमय संगीता मध्ये पार पडले. उपस्थित सुवासिनींनी शिवरायांचे प्रतिमे चे पूजन केले. या प्रसंगी पंडित आंब्रे, बालाजी बर्वे, संदीप वाघ, सचिन इचके, रविराज काळुंके, सुहास बावीकर यांच्यासह जेष्ठ व बच्चे मंडळी उपस्थित होती. विविध उपक्रमा मधून महाराष्ट्रीयन व भारतीय संस्कृती चा वारसा तैवान मराठी मंडळ तर्फे जोपासला जात आहे. या प्रसंगी शिवराया समोर सर्व उपस्थितांनी महाराष्ट्रा ला कोरोना विरुद्ध लढयाचे समर्थ देवो तसेच लवकरच महाराष्ट्र व भारतभूमी कोरोना मुक्त होवो अशी प्रार्थना केली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा