*शरद पवार विचार मंच च्या वतीने आ. गोपीचंद पडळकर यांचा निलंगा येथे जाहीर निषेध*

*शरद पवार विचार मंच च्या वतीने आ. गोपीचंद पडळकर यांचा निलंगा येथे जाहीर निषेध*


निलंगा: महाराष्ट्राचे आधारवड मा. खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे महाराष्ट्र शासनाने या आमदारावर गुन्हा नोंद करावा व राज्यपाल महोदयाकडे आमदार की रद्द करण्याची मागणी शरद पवार विचार मंच निलंगा यांनी मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन करण्यात आले.


आमदार या पदावर काम करत असताना तारतम्य बाळगुन, सामाजिक भान ठेवून शब्दाचा वापर केला पाहिजे . पडळकर , भाजपा प्रदेशाध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांनी महाराष्ट्रातील तमाम जनतेची माफी मागावी अशी मागणी ही शरद पवार विचार मंच निलंगा यांच्या वतीने करण्यात आली. 


यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष तथा शरद पवार विचार मंच चे नेते विनायक (आण्णा) बगदुरे , तालुकाध्यक्ष सुधीर दादा मसलगे, शरद पवार विचार मंच चे कार्याध्यक्ष अंगद जाधव, युवक तथा विचार मंच चे शहराध्यक्ष धम्मानंद काळे माजी तालुका अध्यक्ष संदीप मोरे , महिला आघाडीच्या महादेवी पाटील,शरद पवार विचार मंच महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष पदी रुक्मिणी ताई कांबळे, रेश्मा पटेल, लक्ष्मण क्षिरसागर, गफ्फार भाई लालटेकडे,लिगल सेलचे अँड. गोपाळ इंगळे,अँड.हरिभजन पौळ,पांडुरंग कांबळे, महेश मसलगे,विद्यार्थी चे शैलेश जाधव, प्रमोद जाधव,रोहन सुकाले, सुरज जाधव, अभय चौधरी, वैजनाथ चोपणे,राम पाटील,सुरेश रोळे,पंढरी पाटिल,दयानंद मोरे,जीवन तेलंग, राजेश माने, मोहन माने,व्यंकट कुंभार ईत्यादी बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पण्या
Popular posts
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
लातुरचे मतदार 'लाडक्या बहिणी'च्या पाठीशी डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या पदयात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद
इमेज