जमहूर उर्दू शाळेत राज्यमंत्री बनसोडे यांच्या हस्ते वृक्षारोपण
उदगीर : येथील जमहूर उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शाळेत शुक्रवारी राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, रमेश अंबरखाने, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा.शिवाजीराव मुळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष समीर शेख, सामाजिक कार्यकर्ते अजित शिंदे, रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे, अजीम दायमी, श्याम डावळे, अड. पद्माकर उगीले, माजी नगरसेवक अहमद सरवर, पत्रकार रविंद्र हसरगुंडे, शेख इरफान, तसेच लिबरल एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारीणीचे सदस्य सय्यद हुसेन हाश्मी, इब्राहीम अब्दुल सत्तार, बडे साब कुरेशी, खलील खादरी, फारुख खादरी, हायस्कूल ज्युनिअर कॉलेज मुख्याध्यापक राजा पटेल अब्दुल बाखी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शकील कुरेशी सह सर्व स्टाफ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेच्या सचिव डॉ. अंजुम खादरी यांनी केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा