उदगीरात रविवारी दिवसभरात तिघांचा मृत्यू: 10 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर
उदगीर: उदगीर शहरात मृत्यूचा आकडा रोज वाढत असून रविवारी पहाटे एक व सायंकाळच्या सुमारास दोन अशा तीन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तर 10 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.
उदगीर शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. तसेच मृत्यूचा आकडा रोज वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत उदगीरच्या कोविड रुग्णालयात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
रविवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शिरोळ जानापूर येथील 65 वर्षीय व्यक्तीचा सारिसदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली. कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या हावगीस्वामी महाविद्यालय परिसरातील 60 वर्षीय व्यक्तीचा सायंकाळी 6.15 वाजता तर, मोमीनपुरा भागातील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
काल रविवारी उदगीरच्या कोविड रुग्णालयातील 44 जणांचे स्वब तपासण्यात आले असता त्यापैकी 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण किल्ला गल्ली 1, उमा चौक 1, रेड्डी कॉलनी 2, शिवशक्ती नगर 1, कबीर नगर 1, एस. टी. कॉलनी 3 व सहयोग नगर भागातील 1 अशा दहा जणांचा समावेश आहे. अशी माहितीही नोडल अधिकारी डॉ. शशिकांत देशपांडे यांनी दिली.
addComments
टिप्पणी पोस्ट करा