प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती गोळ्यांचे वाटप
नगरसेवक ऍड. सावन पस्तापुरे यांचा पुढाकार
उदगीर : शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहून प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रभाग क्रमांक 18 चे नगरसेवक ऍड. सावन पस्तापुरे यांच्या पुढाकारातून प्रभागातील नागरिकांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
आज जगात, देशभरात, राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात, उदगीर शहरात वाढलेली कोव्हीड १९ चे रूग्ण पाहून मन हेलावून जात आहे. परवा एका लहान मुलाला कोरोना ची लागण झाल्यामुळे त्या चिमुकल्यास एकटं अॅम्बुंलन्स नी जात असल्याचा व्हिडिओ पाहीला आणि मन सुन्न झालं. अशी वेळ कोणावरही येऊ नये म्हणून प्रभाग क्र. १८ मधील सर्व रहीवास्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३०' या होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप करण्याचा संकल्प केला. आज त्याच संकल्प पुर्तीची सुरूवात शिववगर परिसरा पासुन सुरूवात केली. या संकल्प पुर्ती साठी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, मुख्याधिकारी भरत राठोड, माजी पाणी पुरवठा सभापती मनोज पुदाले, माजी नियोजन सभापती रामेश्वर पवार, नंदकूमार बिजलगावकर यांची उपस्थिती होती. यावेळी शिववगर परिसरातील नागरिक मुरलीधर जाधव काका, रवी हालके, हुडे , बाबुआण्णा कोटलवार, अमोल मळभागे, मिर्झा , यांची ही उपस्थिती होती.
addComments
टिप्पणी पोस्ट करा