*लातूर 240 स्वाबपैकी 164 निगेटिव्ह, 19 पॉझिटिव्ह, 22 अनिर्णित तर 35 प्रलंबित*

*लातूर 240 स्वाबपैकी 164 निगेटिव्ह, 19 पॉझिटिव्ह, 22 अनिर्णित तर 35 प्रलंबित*


*4 जुलै रोजीच्या 25 प्रलंबित अहवाल पैकी 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह*


*आज 5 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला*


*अहमदपूर 1, उदगीर 1 व लातूर 1 एकूण तीन रुग्णांचा मृत्यू*


 


लातूर :- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज दिनांक पाच जुलै 2020 रोजी जिल्ह्यातील एकूण 240 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आलेले होते. त्यातील 164 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह 19 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह 22 व्यक्तींचे अहवाल निर्णय तर 35 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित आहेत अशी माहिती विषाणू सांशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेचे आज एकूण 59 व्यक्तींचे स्वब तापसणीसाठी आले होते त्यापैकी 36 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 14 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत व 09 व्यक्तिचे अहवाल अनिर्णित आले आहेत. लातूर महापालिकेच्या हद्दीतील 24 स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 3 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला असून 3 व्यक्तीचा अहवाल अनिर्णित आहे तर 18 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. लातूर एमआयडीसी येथील 28 व्यक्तींचे स्वाब तपासणीसाठी आले होते त्यातील 8 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून 20 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत.


तसेच अहमदपूर येथील 12 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे तर उर्वरित 11 व्यक्तींचा रिपोर्ट निगेटिव आहे. निलंगा येथून 57 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील 27 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित असून 30 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. जळकोट येथील एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर औसा येथील 46 व्यक्तीचे स्वाब तपासणीसाठी आले होते त्यातील 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे तर 7 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित असून 38 व्यक्तींच्या अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. कासारशिरशीतुन आलेल्या एका स्वबचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. या प्रकारे एकूण 240 व्यक्तींच्या स्वाबपैकी 35 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित, 19 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह, 22 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित तर 164 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे.


*दिनांक 04 जुलै 2020 रोजी लातूर जिल्ह्यातील 25 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. त्यापैकी 07 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले असून 06 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह(यापैकी एक पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती हा पूर्वी पॉझिटिव्ह आहे) त्यामुळे 5 च व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव आला आहे व 12 व्यक्तिचे अहवाल अनिर्णित आले आहेत अशी माहिती, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे* तसेच 4 जुलै रोजी रात्री उशिरा अहमदपूर येथील एक व उदगीर येथील एक असे दोन रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.


जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 189, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 247 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 23 आहे. तर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्णांची संख्या 452 इतकी आहे.


तसेच 3 रुग्ण कर्नाटक राज्यात तर 4 रुग्ण उस्मानाबाद जिल्ह्यात वर्ग केलेले आहेत. परंतु उपचार लातूर येथे सुरू आहेत. त्या रुग्णांची नोंद संबंधित राज्य व जिल्ह्यामध्ये झालेली असल्याने आपल्या जिल्ह्याच्या एकूण रुग्णांच्या संख्येतून 7 रुग्ण कमी करण्यात आलेले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे. त्याप्रमाणेच आज पाच रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.


विलासराव देशमुख शासकीय वैदकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात एकूण 78 कोरोना (कोविड19) पॉझिटिव्ह रुग्ण दाखल आहेत व आज 03 रुग्णांची प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आज एका 65 वर्ष वय असलेल्या रुग्णास दमा व निमोनिया हे आजार होते त्यांचा उपचारादरम्यान दुपारी 12.30 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंढे यांनी दिली.


Popular posts
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
सुधाकर श्रृंगारेच्या विजयासाठी भाजपा युवा मोर्चा सज्ज: जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे.
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image