*डिजिटल शाळेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार : आ. संभाजीराव पाटील निलंगेकर*

*डिजिटल शाळेच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती करणार : आ. संभाजीराव पाटील निलंगेकर*


निलंगा : कोरोना विषाणू संसर्ग आता समुह संसर्गाकडे वळला असून याकरीता ग्रामीण भागातील लोकांमध्ये सतत जनजागृती करणे आवश्यक आहे. याचाच एक भाग म्हणून येणार्या पंधरवाड्यात प्रत्येक गावातील डिजीटल शाळेच्या माध्यमातून लोकांची, अधिकारी वर्ग, आरोग्य यंत्रणा व लोकप्रतिनिधीशी सुसंवाद साधून त्यांच्यामध्ये कोरोना विषाणू बाबत जनजागृती करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी आढावा बैठकीत केले.


 येथील उपविभागीय कार्यालयाच्या सभागृहात आज शुक्रवारी माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोना विषाणू प्रतिबंधाबाबत अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. यावेळी भाजपाचे युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, नगराध्यक्ष बाळासाहेब (श्रीकांत) शिंगाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख, निलंगा तहसीलदार गणेश जाधव, देवणी तहसीलदार सुरेश घोळवे, शिरुर अनंतपाळ तहसीलदार अतुल जटाळे, निलंगा गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, देवणीचे मनोत राऊत, शिरुर अनंतपाळचे नंदकिशोर शेरखाने, न.प.मुख्याधिकारी मल्लिकार्जून पाटील , आरोग्य अधिकारी डॉ,श्रीनिवास कदम आदी उपस्थित होते.


कोरोना विषाणूचा संसर्ग आता शहरी भागातून ग्रामीण भागात आला आहे. याकरीता आता ग्रामीण भागातील यंत्रणा सुसज्ज करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच या भागातील जनतेमध्ये याकरीता जनजागृती करणे आवश्यक आहे. शहरी भागातील राहणीमान व ग्रामीण भागातील राहणीमानामध्ये भरपूर फरक असतो. त्यामूळे जनतेशी सुसंवाद साधुन त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. या करीता विविध योजना अंमलात आणून काम गरजेचे आहे. त्या बरोबरच सर्वां ची सुरक्षितताही महत्वाची आहे.  


 


सध्या मतदारसंघात गाव स्वास्थ्य व सुरक्षा अभियाना अंतर्गत थर्मल मिटर व ऑक्सीमीटरव्दारे नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी सर्व पदाधिकारी, सरपंच,ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी,तलाठी, आशा ताई व बीएलओ यांच्या मार्फत करण्यात येत आहे. यात देवणी मधील 23497 , शिरुर अनंतपाळ 5929,व निलंग्यातील 1400 लोकांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणी दरम्यान शहरातील व मदनसुरी येथील प्रत्येकी एका रुग्णाची कोरोना तपासणी करणे गरजेचे आहे असे लक्षात आल्यानंतर ते दोन्ही रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता आणखी सुक्ष्म पध्दतीची तपासणी करण्याच्या सुचना आ. निलंगेकर यांनी केल्या. 


 


कोरोना या आजारापासून भयभीत होण्यापेक्षा त्यापासून वाचण्यासाठी उपाययोजना करणे गरजेच्या आहेत. त्यासाठी प्रत्येक कुटुबांत एक कोरानायोध्दा तयार करणे गरजेचे आहे. याबरोबर कुटुबांती प्रत्येक सदस्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आजीच बटवा, योगासने व वनस्पती औषधाचा वापर करणेही गरजेचे असल्या बाबत जनजागृती व प्रसार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना विषाणू हा आता आपल्या भागातही समूह संसर्गात आला असून या करिता आरोग्य यंत्रणेने सांगितलेल्या सुचनांचे तंतोत पालन करणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शासनाने या करीता ठरवून दिलेल्या नियमाचे पालनही काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. या करीता प्रथम नागरीकांमध्ये विविध उपाय योजनेतून प्रसिध्दी करुन त्यांच्या नंतर काही ठिकाणी कारवाईही करणे गरजेचे असल्याच्या सुचनाही आ. निलंगेकर यांनी अधिकार्‍यांना केल्या.


या बैठकी नंतर माजी पालकमंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा शहरातील कन्टेंनमेंट झोन ची पाहणी करुन अधिकार्‍यांना सुचना केल्या.


Popular posts
श्रमदानाने महिलांनी केला जागतिक महिला दिन साजरा : ग्रीन आर्मीचा पुढाकार उदगीर : वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करीत पर्यावरणाची जपणूक करण्याच्या कामात सतत अग्रेसर असलेल्या ग्रीन आर्मी या संघटनेच्या माध्यमातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी श्रमदान करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा केला. देगलूर रोडवरील पाटबंधारे कार्यालयाच्या परिसरात ऑक्सिजन पार्क निर्माण करण्याचा संकल्पही या निमित्ताने करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन आर्मीच्या वतीने गत जून महिन्यात या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली होती. यातील बरीच झाडे जगली असून त्यांच्या संवर्धनासाठी आज महिलांनी श्रमदान करीत झाडांना पाणी घातले. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानीही या श्रमदांनात सहभाग नोंदविला. या ऑक्सिजन पार्कसाठी रश्मी सूर्यवंशी यांनी दहा झाडे भेट देवून ती जगविण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमासाठी ग्रीन आर्मीच्या अध्यक्षा अरुणा भिकाने, अर्चना नळगीरकर,अनिता यलमटे, शोभाताई कोटलवार, सरिता खोडे, रश्मी सूर्यवंशी, साधना रायवाड, वर्षा कोटलवार आदींनी पुढाकार घेतला. डॉ. अनिल भिकाने, विश्वनाथ बिरादार माळेवाडीकर, गोपालकृष्ण नळगीरकर, ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, पत्रकार विक्रम हलकीकर, ऍड. निशांत धवलशंख यांच्यासह पाटबंधारे विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
Image
उदगीरात महिला बचत गटातील सदस्यांचे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण शिबीर संपन्न नगर परिषदेच्या उपक्रम: जागतिक महिला दिनाचे औचित्य
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image