प्रलंबित अहवालात उदगीरचे 7 पॉझिटिव्ह तर निलंगा येथील 8

प्रलंबित अहवालात उदगीरचे 7 पॉझिटिव्ह तर निलंगा येथील 8


लातूर: लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत जिल्ह्यातील 90 जणांचे अहवाल काल दि. 14 जुलै रोजी प्रलंबित राहिले होते. त्यांचा अहवाल आज आला असून 53 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 37 जनांचे अहवाल इंक्लुझिव्ह आले आहेत.


उदगीर येथील 13 जणांचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 6 जणांचे अहवाल इंक्लुझिव्ह आहेत. निलंगा येथील 17 जणांचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 8 जनांचे अहवाल पॉझिटिव्ह तर 9 अहवाल इंक्लुझिव्ह आले आहेत.