महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 94.70 टक्के 

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा बारावीचा निकाल 94.70 टक्के


 उदगीर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी , मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचा निकाल 94. 70 टक्के लागला असून विज्ञान शाखेत कोटलवार रिया गजानन हिने 610 गुण घेऊन प्रथम, काकनाळे समृद्धी विलास 576 गुण घेऊन द्वितीय, शेख फैजान जमीर 548 गुण घेऊन तिसरा आला आहे. विज्ञान शाखेचा निकाल 96. 66 टक्के लागला असून 11 विद्यार्थी विशेष प्राविण्य, 93 प्रथम श्रेणीत आहेत. कला शाखेत बिरादार संतोषी प्रशांत 584 गुण घेऊन प्रथम, बिरादार सिद्धेश्वर दिलीप 547 गुण घेऊन द्वितीय, गुंजरगे नलिनी सुभाष 536 गुण घेऊन तिसरी आली आहे. कला शाखेचा निकाल 90.47 टक्के लागला असून 9 विशेष प्रावीण्य, 21 प्रथम श्रेणीत आहेत. वाणिज्य शाखेत खत्री लीना सुभाष 614 गुण घेऊन प्रथम, बिरादार वैभवी सूर्यकांत 603 गुण घेऊन द्वितीय, कांबळे आकाश धोंडीबा 551 गुण घेऊन तृतीय आला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 92.53 टक्के लागला असून 15 विशेष प्राविण्य , 55 प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. एच. एस. सी. होकेशनल शाखेचा निकाल 85 टक्के लागला असून धूमसुरे राहूल बालाजी 489 गुण घेऊन प्रथम, मगर गोपीचंद सोपानराव 487 गुण घेऊन द्वितीय, वाघमारे सोनाबाई ज्योतीराम 461 गुण घेऊन तृतीय आली आहे.


गुणवंतांचे संस्थेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सचिव प्रा. मनोहर पटवारी, सहसचिव डॉ. श्रीकांत मध्वरे, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, प्रभारी प्राचार्य डॉ. आर. आर. तांबोळी, उपप्राचार्य डॉ. राजकुमार मस्के (व.म.), उपप्राचार्य प्रा.आर. एन. जाधव (क.म.) , पर्यवेक्षक प्रा. सी. एम. भद्रे, प्रा. जे.आर. कांदे , प्रा. टी. एन. सगर यांनी अभिनंदन केले आहे .


Popular posts
*जागतिक वन दिनी जिल्हाधिकारी रमल्या फुलांच्या-पक्षांच्या सान्निध्यात !*
Image
*वाद-विवाद स्पर्धेच्या ढाल विजयाचे मानकरी ठरले परभणीचे गांधी विद्यालय*
Image
*स्व. खाशाबा जाधव राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा* *आकाश, ओंकार, रणजित, विशाल यांनी गाजविला उद्घाटनाचा दिवस*
Image
*किडझी स्कुल चे झाँकी हिंदुस्थान की वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात साजरे......*
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image