निर्ममत्वाचे उपासक:विनायक महाराज

निर्ममत्वाचे उपासक:विनायक महाराज
-------------------------------
वे शा सं प्रवचनकार भागवतकार सर्वांच्या मनाचा ठाव घेणारे सर्वांना आदरणीय प पु श्री विनायक गोविंद महाराज देवताळ कर यांचे दि. 13 मार्च  रोजी शनिवार रोजी देहावसन झाले.  देवताळ संस्थान शोकसागरात बुडाले .घरातील वातावरण सैरभैर  झाले काही सुचेनासे झाले.


खडतर जीवन जगून इतरांना सुखी करण्याचा त्यांचा विचार हा मानवतावादी विचार त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू होता. निराधार मुलांना विनामूल्य वैदिक ज्ञान देवून अनेक कुटुंबांना आधार दिला व वैदीक परंपरेला बळ दिले.


मग कर्मफल त्यागु । तो ध्यानापासोनि चांगु ।
त्यागाहूनि भोगू ।शांतिसुखाचा ।।


कर्मफल त्याग करणे सोपे नाही.निरपेक्ष सेवा ही ईश्वरास आवडते. त्याहून शांती प्राप्त होते. शांती हे सुखाचे दुसरे नाव आहे.


अद्वैष्टा सर्वभूतानां मैत्र: करुण एवं च।
निर्ममो निरहंकार: समदु:खसुख: क्षमी।।


वरील सर्व भक्तांची लक्षणे त्यांना तंतोतंत लागू पडतात. सर्व भूतांच्या विषयी त्यांच्या अंतकरणात द्वेष नाही. आणि प्रेम आहे आणि मित्रभावाने वागणारा आहे दया करणारा आहे. ममत्व बुद्धी सुटलेली आहे. अहंकार रहित सुख-दुःख सारखे मानणारा आणि क्षमाशील असणार आहे.


जो कर्तव्यकर्म करीत असताना मुलांविषयी अभिलाषा बाळगीत नाही. सदा शांत आणि समाधानीच असतो .त्यालाच भगवान तोच सन्यासी,तोच योगी असे म्हणतात. केवळ भगवे वस्त्र धारण केल्यामुळे कोणी संन्यासी होत नाही.विनायक महाराज या बाबतीत ज्या पद्धतीने जीवनाला सामोरे गेले.नामस्मरण मनन-चिंतन यामध्ये रममाण झाले.चिंता निराशा कधी चुकुनही त्यांच्या आसपास फिरकली नाही. नेहमी सकारात्मक विचार,सकारात्मक दृष्टी व सकारात्मक कृती ही त्यांची त्रिसूत्री होती.


एकदा लोकमान्य टिळकांना अटक होवुन पोलीस कोठडीत डाबण्यात आले.जामीन मिळु नये म्हणून अटक संध्याकाळी उशिरा करण्यात आली.श्री खरे ही टिळकांचे मित्र त्यांना भेटावयास आले. त्यावेळी लोकमान्य टिळक कोठडीत शांतपणे गाढ झोपलेले होते.युरोपियन रक्षक तो ख-यांना म्हणाला "कैसा आदमी है सो गया" पोलीस कोठडीत मनुष्य झोपू शकतो हे त्याने त्याच्या आयुष्यात प्रथमच पाहिले होते.कर्तव्य कर्म करीत असतानाही त्यांच्या अंतकरणात फलाशक्ती होती.आतापर्यंत तडफडणारे,तळमळणारे,रडणारी माणसे त्यांनी पाहिली होती.फलासक्ती नसणाऱ्यास कोणताही ताण नसतो अगदी तसेच महाराजाच्या बाबतीत घडत असेल.त्यांना कुठेही केव्हाही कोणत्याही वेळी झोप सहज येत असे. त्यांच्या विचारांची प्रगल्भता,व्यापकता,विशुद्धता व आचाराचा विवेक सर्वांना हवाहवासा वाटायचा. सर्वांबद्दल स्नेह आपुलकी हा त्यांचा स्थायीभाव होता. सच्चिदानंद तत्वाचा,अखंडतेचा, व्यापाकतेचा येणारा अनुभव त्यां माणसाच्या जीवनाला परिपूर्णता देतो. प्रपंच व परमार्थ भिन्न नसून एकच आहेत. त्यात गुंतून न पडता परमेश्वरावर विश्वास ठेवून श्रद्धा बाळगून त्यांनी  ध्यान करून उपासना करून आपली मनोकामना पूर्ण करता येते. हे स्वतःला सिद्ध पुरुषाप्रमाणे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिले.


सोळाव्या अध्यायात पहिले तीन शोल्क  दैवी संपत्तीचे वर्णन करतात. निर्भयपणा,अंत:करणाची शुद्धता,ज्ञानयोगतील स्थिरता  दान ,इंद्रिय निग्रह,यज्ञकर्म शास्त्राभ्यास, तप आणि सरळपणा,अहिंसा, सत्य,क्रोध नसणे. स्वार्थत्याग शांत वृत्ती,दृष्ट बुद्धीचा अभाव,भूतदया,निर्लॉभ,सौजन्य,शालीनता,नम्रता, हालचालीत अस्थिरता नसणे,तेज, क्षमावृत्ती धैर्य,दटून उभे राहण्याची क्षमता पवित्रता दुसऱ्याचा मत्सर न करणे,नातीमानता हे गुण दैवी संपत्ती घेऊन जन्माला येणार्‍याच्या ठिकाणी असतात. जसे अनेक दुर्मीळ गुण त्यांचा जन्मजात होते हे त्यांचे वेगळेपण भावते.


उत्तम ते कुळ,पवित्र तो देश |
 जेथे हरीचे दास,जन्म घेती ||


सदाचरणी आणि श्रीमंत अशा गृहस्थाच्या घरी जन्म लाभण्याने जी अनुकूलता सहजपणे लाभते त्याहीपेक्षा अनुकूल परिस्थिती विद्वान सत्पुरुषाच्या कुळात जन्म मिळाल्याने लाभते.तसे भाग्य प.पू. स्व श्री विनायक महाराजांना लाभले. परंतु सर्व प्रकारचा लाभ आपोआप मिळतो असे समजण्याचे कारण नाही.


कारण एकाच कुळात जन्म होऊन धर्म व दुर्योधन यांच्यात पूर्ण भिन्नता आढळते.एक सदाचारी तर दुसरा दुराचारी,एकाचे चांगले विचार तर दुसरा दुष्ट विचार,एक विधायक तर दुसरा विघातक,सद्गुण मानवी जीवन उन्नत करतात. दुर्गुण विनाश घडवतात भागवत सांगताना नेहमी वरील बाबी लोकांना समजवण्याचा ते प्रयत्न करीत असत.


 महाराज आधुनिकता व शास्त्र यांचा समन्वय घडवत. शास्त्र प्रमाण मानावे शेकडो वर्षांच्या अनुभवातून ते साकारलेले आहे. अनेक पिढ्यांचे तत्वज्ञान अनेक पिढ्यांचे शहाणपण त्यात ग्रंथित झालेले आहे. ते सार आहे ते तुम्हाला सहज प्राप्त झाले आहे. ते नेहमी म्हणत असत.


 जीवन हे विचारपूर्वक जगावे अविचारी कार्य करु नये. दुसर्‍यांचा द्वेष कधीही करू नये प्रेमाने वागणे हाच खरा धर्म आहे. मानवतेची पूजा हीच ईश्वर सेवा आहे.चांगले केलेले काहीही कधीही वाया जात नाही.


'भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नही" असे ते म्हणत असत. भगवान उदार आहे, दयाळू आहे तसाच न्यायी आहे.तो सर्वज्ञ व सर्वशक्तिमान आहे.' वर्म जाणे तो पारखी' भगवंताविषयी प्रेम,मनाची शांतता,अंतकरणाची प्रसन्नता, बुद्धीचे स्थैर्य वृत्तीचे,समाधान,साधनेची गोडी, ईशदर्शन लालसा संतांचा सहवास तत्त्वांची समज इत्यादी दुर्मिळ गुण त्यांच्यात एकवटलेले होते. अखंड कृष्णानंद हे नाव त्यांच्या मुखातून उच्चारले जात होते.13/6/2020 रोजी  सकाळी जेव्हा उदगीरला घेऊन नेण्यासाठी त्यांच्या हाताला धरून आम्ही कार कडे घेऊन जात होतो. तेव्हा सतत अखंडित कृष्णानंद-कृष्णानंद ते नामस्मरण करीत होते.


 भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगताना आठव्या धड्यातील पाचवा श्लोक 


अंतकालेचे मामेव स्मरणमूक्त्वालेवरम|
य: प्रयाति स मदभाव याती ना स्त्यत्र संशेय:||


जो पुरुष अंतकाली माझे स्मरण करीत देहत्याग करितो. तो मजपत येवुन मिळतो हे नि:संशय होय.


 या भगवत उक्तीप्रमाणे अंतकाळ जवळ असता कोणतीही अपेक्षा मनात न ठेवता निरपेक्षबुद्धीने निर्ममत्वाचा भाव मनामध्ये ठेवून हसतमुखाने कृष्णानंदाचे स्मरण करून देहभान विसरून कृष्णानंदाच्या चरणी लीन झाले. 
धन्य ते जनन धन्य ते मरण |कृष्णानंद महाराज की जय |
प्रा. रमेश विठलराव जोशी
पाटोदेकर


टिप्पण्या
Popular posts
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
बहारदार नाट्यसंगीताचा 'दिपसंध्या' कार्यक्रम संपन्न संस्कार भारतीचा उपक्रम
इमेज
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज