नगराध्यक्ष बागबंदे यांच्या नावाने फेक फेसबुकखाते: फेसबुक मेसेंजरवरून केली पैशाची मागणी *नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी केली पोलिसांत तक्रार*

नगराध्यक्ष बागबंदे यांच्या नावाने फेक फेसबुकखाते: फेसबुक मेसेंजरवरून केली पैशाची मागणी


*नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी केली पोलिसांत तक्रार*


उदगीर : सध्या फेसबुक खाते हॅक होण्याचे प्रकार वाढले असताना बनावट फेसबुक खाते काढणाऱ्यांचीही टोळी अस्तित्वात आल्याचे दिसत आहे. उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या नावाने बनावट खाते काढून त्याद्वारे फेसबुकवरील मित्रांना पैसे मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान या प्रकरणी नगराध्यक्ष बागबंदे यांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


उदगीर शहरात मागच्या आठवड्यात फेसबुक हॅक करून फेसबुक मेसेंजर द्वारे दत्तात्रय वट्टमवार यांच्या फेसबुकवरील मित्रांना पैसे मगितल्याची घटना ताजी असतानाच आता उदगीरचे नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांच्या नावाने बनावट फेसबुक खाते काढण्यात आल्याचे उघड झाले. शिवाय या बनावट फेसबुक खात्यावरून नगराध्यक्ष बागबंदे यांच्या नावाने फेसबुकवरील मित्राना पैसेही मागितले गेले आहेत. हा प्रकार नगराध्यक्ष बागबंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सावध होऊन या प्रकरणी उदगीर शहर पोलिसात आपली तक्रार नोंदवून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 


संबंधित बनावट फेसबुक अकाउंटशी कोणीही संपर्क साधू नये व कसला व्यवहार करू नये असे आवाहन नगराध्यक्ष बस्वराज बागबंदे यांनी केले आहे.


फेसबुक खाते हॅक करणे अथवा बनावट खाते करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांची संख्या वाढत असून फेसबुक हाताळणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे अशा लोकांना शोधून त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी फेसबुक धारकाकडून केली जात आहे.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
बेवारस पडलेल्या इसमाचा जीव वाचविला : माजी नगरसेवक अहमद सरवर यांची तत्परता
बँकांनी कर्जदारांकडून  कर्जाची वसुली सक्ती करु नये -जिल्हाधिकारी जी.श्रीकांत 
Image
*विद्यार्थ्यांचे शिल्पकार शिक्षक* *शिक्षकांचे शिल्पकार*.......... *माननीय श्री रमाकान्तराव बनशेळकीकर गुरुजी*🙏
Image