लॉकडाउन काळातील विजबिल माफ करा- वंचितची मागणी

लॉकडाउन काळातील विजबिल माफ करा- वंचितची मागणी


उदगीर : देशात कोरोनाचे सावट पसरले असुन या उपाययोजना म्हणून केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउन घोषित केले. गेली तीन महिने राज्य सर्वच बंद होते. जनता घरात बसून होती. याकाळात जनतेने शासनाचे आदेशाचे पालन केले असले तरी त्यांना खुपमोठ्या अर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाउनच्या काळातील तीन महिन्याचे विज बिल माफ करावे, आशी मागणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपजिल्हाधिकऱ्यांना देण्यात आलेल्यख निवेदनात करण्यात आली आहे.
            कोरोनाच्या महामारीमुळे राज्यातील प्रत्येक व्यक्ती संकटात सापडला असुन शासनाने लॉकडाउन जाहिर करीत सर्वच उद्योग व कामधंदे बंद करीत. जनता कर्फ्यु घोषित करित जनतेला घरात बसून राहवे लागले. तळहातावर पोट असनारे अनेक जन कित्येक दिवस उपाशी राहिले. या कोरोनामुळे गरिब व मध्यम वर्गीयांचे जीवन डबघाईला आले आहे. त्यांना सावरण्यासाठी शासनाच्या मदतीची गरज असुन शासनाने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात शिवाय लॉकडाउन काळातील राज्यातील सर्वच विज ग्राहकांचे विज बिल माफ करावेत आशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.
      उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनावर  जिल्हाउपाध्यक्ष प्रा डॉ. अतुल धावारे, जिल्हा प्रवक्ता डॉ. संजय कांबळे, तालुकाध्यक्ष पि. डी. कांबळे, दिलीप कांबळे, सचिन जाधव, वामनराव सुर्यवंशी, राजु कांबळे, आमोल नेत्रगावकर,  भैयासाहेब कांबळे, प्रविण घोरपडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. शिवाय या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व कार्यकारी अभियंता, उदगीर यांनाही देण्यात आली आहे.


टिप्पण्या
Popular posts
उदगीर मतदार संघात आजपासून स्वाभिमान संवाद यात्रा : अजित शिंदे
इमेज
उदगीरचे दोघे भाऊ गाणगापूरच्या नदीत बुडून ठार : सोबतचा एक मित्र जखमी
इमेज
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर माजी नगरसेवक रामेश्वर पवार यांचे उपोषण मागे
इमेज
निलंग्याचे निळकंठेश्वर मंदिर मराठवाड्याचे भूषण : ह भ प गहिनीनाथ महाराज औसेकर
इमेज
उदगीरच्या दूध डेअरीसंदर्भात लवकरच एन डी डी बी च्या अधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
इमेज