रसिकांना भावला आभासी विश्वातील श्याम! आंतरभारतीच्या उपक्रमास प्रतिसाद
उदगीर: एकविसाव्या शतकातल्या आभासी विश्वातही श्यामची आजही प्रभावी असल्याचे दिसून आले. आंतरभारतीच्या माध्यमातून धनंजय गुडसूरकर यांनी सादर केलेल्या एकपात्री प्रयोगास रसिकांचा प्रतिसाद मिळाला.
टाळेबंदीच्या काळात आंतरभारती या साने गुरुजींच्या स्वप्नातील संस्थेने ६४ कलांच्या सादरीकरणाचा उपक्रम आयोजित केला आहे.या उपक्रमांतर्गत धनंजय गुडसूरकर यांनी "हॕलो,मी श्याम बोलतोय या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण आंतरभारतीच्या फेसबुक पेजवरून केले.
श्यामचे बालपण,त्याच्या कुटुंबाची
बदलती परिस्थिती ,त्यातून निर्माण होणारे प्रश्न ,विपरीत परिस्थितीतही श्यामची आई ची मुल्यावरील निष्ठा , वर्तनातून मुलांवर केलेले संस्कार याचे सुंदर विवेचन या एकपात्री प्रयोगातून गुडसूरकर यांनी केले.
या एकपात्री प्रयोगातून गुडसूरकर यांनी वेगवेगळ्या दहा भूमिका साकारल्या."एका डोळ्यात हासू अन दुसऱ्या डोळ्यात आसू " आणणाऱ्या या प्रयोगाने रसिकांना मंत्रमुग्ध तर केलेच पण संस्काराची पेरणीही केली.दीड हजार रसिकांनी याचा लाभ घेतला."गुडसूरकर यांनी सादर केलेला प्रयोग अत्यंत प्रभावी असून शाळाशाळांमधून त्याचे सादरीकरण होणे गरजेचे आहे"अशा शब्दांत आंतरभारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य सदाविजय आर्य यांनी या कलाविष्काराचे कौतुक केले. हा नाट्याविष्कार कौतुकास्पद असल्याचे आंतरभारतीचे राष्ट्रीय सचिव अमर हबीब म्हणाले.६४ कला सादरीकरणाच्या माध्यमातून कलांचा परिचय व दृढीकरण होत असल्याचे कार्यक्रम कार्याध्यक्ष डी.एस.कोरे यांनी सांगितले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा