उस्मान पठाण यांचा सेवा निवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार.

उस्मान पठाण यांचा सेवा निवृत्ती निमित्त सपत्नीक सत्कार.


उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील प्रयोगशाळा परिचर उस्मान हुसेनसाब पठाण सोमवारी सेवानिवृत्त झाले. यामुळे संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसुरे, प्रा. एन. आर. लांजे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उस्मान पठाण यांचा सपत्नीक भर पेहराव, साडी चोळी व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. प्राचार्य प्रमोद चौधरी, प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. व्ही. एम. तोडकर, प्रा. बी. एस. बाबळसुरे  प्रा. एन.आर. लांजे आदींनी पठाण यांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक व संचलन रसूल पठाण यांनी केले तर आभार अमर जाधव यांनी मानले. यावेळी पठाण परिवारातील सदस्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.