माजी विद्यार्थ्यांनी केला गुरुजींचा स्मृतिदिन साजरा : मोरे गुरुजींच्या आठवणींना उजाळा: ऑनलाइन कार्यक्रमात अनेक देशातील स्थायिक विद्यार्थ्यांचा सहभाग

माजी विद्यार्थ्यांनी केला गुरुजींचा स्मृतिदिन साजरा


मोरे गुरुजींच्या आठवणींना उजाळा: ऑनलाइन कार्यक्रमात अनेक देशातील स्थायिक विद्यार्थ्यांचा सहभाग


उदगीर : प्रत्येकाच्या जीवनात आईनंतर गुरुचे योगदान मोठे आहे. गुरूंनी दिलेल्या शिक्षणामुळेच विद्यार्थ्याचे आयुष्य घडत असते. अशा आपल्याला घडविलेल्या गुरुप्रती विद्यार्थ्यांमध्ये आदरभाव असतो. असाच आदरभाव दाखवत लालबहादूर शास्त्री विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे गुरू मनोहरराव मोरे गुरुजी यांचा स्मृतिदिन ऑनलाइन साजरा करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या ऑनलाइन कार्यक्रमात मोरे गुरुजींच्या हाताखाली घडलेल्या व अनेक देशात स्थायिक असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.


स्व. मनोहरराव मोरे गुरुजी यांनी लाल बहादूर शास्त्री विद्यालय ,उदगीर येथे अनेक वर्षे अध्यापनाचे काम करीत असताना विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. 


त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त 1995 च्या बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी आठवणीतील मोरे गुरुजी हा आॅनलाईन कार्यक्रम आयोजित केला. या प्रसंगी गुरुजींच्या कन्या लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील सह शिक्षिका, साहित्यिका नीता मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 


या कार्यक्रमात अपर्णा पटेल,आश्विनी सताळकर,आबोली सताळकर, गीतांजली पाटील, सीमा सब्बनवाड,अर्चना डांगे,आश्विनी चवळे, कपिल कलपे, समीर महाजन,विक्रम संकाये,निशांत ढवलशंख,हर्षल नेलवाडकर, गिरीश जोशी,अमृत नळेगावकर यांनी मनोगत व्यक्त करून मोरे गुरुजींच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन आश्विनी संजय देशमुख यांनी केले. आभार ऍड. विक्रम संकाये यांनी मानले.