लाॕकडाऊनमुळे पुरोहीताची आर्थिक घडी विस्कटली

लाॕकडाऊनमुळे पुरोहीताची आर्थिक घडी विस्कटली


उदगीरः लाॕकडाउन मुळे शेती व्यापारी वर्ग, उद्योगधंदे यांचावर आर्थिक संकट ओढवले आहे.पोरोहित्य करणाऱ्या पुरोहित वर्गापुढे ही पोटापाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. लाॕकडाउन काळात पूजाअर्चा शांति पाठाची कामे बंद होती .निर्बंध काही शिथिल झाले असले तरी गृहनिर्माण संस्था आणि हौसिंग सोसायट्यानी काॕलनी [गल्ली] स्वतंत्र बंधने तयार केल्याने पौरोहित्य करणाऱ्यांवर कामे असूनही परवानगी मिळत नाही .त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाली असून,त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्यासाठी नित्योपचार पूजा वगळता देव देवतांची मंदिरे आणि इतर धार्मिक विधी बंद करण्यात आले. मंदिरातील भक्तांसाठी होणारी पूजाअर्चा आणि घरोघरी चालणारे धार्मिक विधी यामध्ये खंड पडला आहे. त्यामुळेच पोरोहित्य करणाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. कोरोणाच्या उद्रेकामुळे आणि त्याला अटकाव करण्यासाठी मागील तीन महिन्यापासून जाहीर करण्यात आलेल्या लाॕकडाउन मुळे पौरोहित्य करणाऱ्या अनेक गुरुजींच्या [पूजारी] कुटुंबावर उपासमारी ची वेळ आली आहे .सर्व आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले असून मुलांचे शिक्षण, आजारपण आणि कौटुंबिक खर्चासाठी कर्ज काढण्याची वेळ त्यांचावर आली आहे .एप्रिल मे आणि जून महिन्यात साखरपुडा आणि लग्नाचे जवळपास ३३ मुहूर्त होते. परंतु कोरोनाचे विघ्न आल्याने या सर्व तारखा रद्द झाल्या. वास्तूशांती,शांती, मूंज व्रतबंध, ग्रहयद्न, सत्यनारायण,अभिषेक यांच्या तिथी नुसार काही दिवस अगोदर तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. हे सर्व कार्यक्रम रद्द झाल्याने तीन महिने घरात बसून रहावे लागले आहे. बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आल्याने श्राद्धकर्माचे सोपस्कार देखील बुडाले. एकंदरीत सुरू असणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांची घडी पूर्णतः विस्कटलेली आहे. लाॕकडाउनमुळे आयटी, औद्योगिक,व्यावसायिक,व्यापारी वर्गापासुन ते सामान्य वर्गापर्यंत सर्वांना आर्थिक झळ बसली आहे .त्याच प्रमाणे पौरोहित्य करणाऱ्या वर्गावर विपरीत परिणाम झाला आहे. कसेबसे छोट्या-मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या तारखा घेऊन काम करण्यास सुरवात झाली आहे.परंतु अनेक काॕलनी [गल्ली] बंधने घातल्याने प्रवेश दिला जात नाही .


नेहमीच्या यजमानांना आर्थिक चणचण भासत आसल्याने त्यांनी देखील धार्मिक कार्यक्रम करण्यास हात आखडता घेतला आहे. तर काही यजमानांच्या मनात अद्यापही कोरोनाची भीती आसल्याने परंपरेनुसार वार्षिक कार्यक्रमांना तिलांजली दिली आहे.


----------------------


श्रावण महिना अवघ्या पंधरा दिवसांवर असताना अद्याप पूजाअर्चांबाबत यजमांनाकडून बोलावणे नाही किंवा मोठे कार्यक्रम नसल्याने पुढेही उपजीविकेचा प्रश्न कायम राहणार आसल्याची चिंता पुरोहित वर्गातून व्यक्त केली जात आहे, त्यामुळे अडचणीत भर पडत आहे.शासनाने तात्काळ लक्ष देऊन योग्य तो मार्ग काढावा.[पुरोहित].वे.शा.सं.वासुदेव महाराज (द्वैपायन)


-----------------------


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही