लाच मागीतल्याप्रकरणी गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

लाच मागीतल्याप्रकरणी गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांच्यासह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल


उदगीर : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण व कुमदाळ-हेर ता. उदगीर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रल्हाद सूर्यवंशी यांच्याविरुद्ध दहा हजाराची लाच मागितल्याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुमदाळ-हेर ता. उदगीर येथील प्राप्त मुळ तक्रारीवरून सापळा रचून कार्यवाही दरम्यान यातील लोकसेवक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंकूश चव्हाण दि.2 जुलै रोजी पंचासमक्ष ठरलेले तक्रारदारांचे कुमदाळ ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत पाणी पुरवठ्याच्या मोटारीचे 59 हजार बील व अंगणवाडी साहित्याचे 11,200 बिलाच्या प्रस्तावावर सही करण्यासाठी व यापूर्वी काढलेल्या एलईडीचे 1 लाख 48 हजार असे एकूण तीन लाखाच्या बिलाच्या दोन टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली.


 


सदर लाचेची रक्कम तीन जुलै रोजी देण्यासाठी गेले असता सदर रक्कम गटविकास अधिकारी यानी ग्रामसेवकास देण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदार यानी दि.4 जुलै रोजी 11.15 मिनीटाला ग्रामसेवक प्रल्हाद सूर्यवंशी यांची पंचायत समिती येथे पंचासमक्ष भेट घेऊन गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे आपण दहा हजार रुपये साहेबांना देऊ असे म्हणून लाचेची मागणी केली.


 


ठरलेली लाचेची रक्कम घेण्याचा संशय आल्याने जाणून बुजून टाळले म्हणून या दोघांविरुद्ध कायदेशीर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


 


दि.2 जुलैपासून लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या विभागाच्यावतीने या प्रकरणातील चौकशी करून सर्व पुरावे गोळा केले. ठोस पुरावे मिळाल्यानंतर व सदर लाचेची मागणी केल्याचे निदर्शनास आल्यानंतर तक्रार देऊन गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे दराडे यांनी सांगितले. या पथकात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधीक्षक बेद्रे, पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, मोहन सुरवसे, रूपाली भोसले, शिवा कच्छवे, आशिष क्षीरसागर, महाजन यांचा समावेश होता.


 


 


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही