जयहिंद सीबीएसईचा शंभर टक्के निकाल: सहाव्या वर्षी ही निकालाची उज्ज्वल परंपरा कायम

जयहिंद सीबीएसईचा शंभर टक्के निकाल


सहाव्या वर्षी ही निकालाची उज्ज्वल परंपरा कायम


उदगीर : मार्च 2020 मध्ये सीबीएसई बोर्डाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील जय हिंद सीबीएसई या इंग्रजी शाळेने मागील सहा वर्षाच्या दहावीच्या निकालाची परंपरा कायम राखत शंभर टक्के निकाल आला आहे. 


स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था प्रसारक द्वारा संचालित जय हिंद सीबीएसई इंग्रजी शाळेची मुहूर्तमेढ संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधीर जगताप यांनी रोवली. ग्रामीण भागात शालेय विद्यार्थ्यांना केंद्राच्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न द्वारे शिक्षण मिळावे यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात याठिकाणी जय हिंद च्या नावाने एक रोपटे लावले. बघता बघता याठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना केंद्राच्या धरतीवर इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळू लागले. ग्रामीण भागातील या परिसरातील ही एकमेव सीबीएसई मान्याता प्राप्त इंग्रजी शाळा असून मागील सहा वर्षांपासून याठिकाणी दहावीचे निकाल 100% आणण्याचा प्रयत्न केला आणि त्याला यश सुद्धा आले. 


जय हिंद सीबीएसई या इंग्रजी शाळेतून यंदाच्या दहावीच्या परीक्षेसाठी अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यामध्ये चार विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे. त्यामध्ये सौदागर सलमान बक्षसुमिया याने 93.90 टक्के गुण घेऊन पहिला येण्याचा मान पटकावला आहे. सय्यद सफुरा मोनोदिन हिने 91.40 टक्के गुण घेऊन द्वितीय येण्याचा तर कुलकर्णी ऋतूपूर्ण मधुकर याने 90.40 टक्के गुण प्राप्त करत शाळेतून तृतीय येण्याचा बहुमान पटकावला आहे. 


तसेच शाळेतील अकरा विद्यार्थ्यांना 80 टक्के ते 89 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. सात विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी उत्तीर्ण होता आला आहे. 


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर जगताप संचालक रोहित वाघे शैक्षणिक संचालक संजय फट्टे शाळेच्या प्राचार्य मनोरमा शास्त्री उपप्राचार्य सतीश वाघमारे व शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी पालकांनी अभिनंदन केले आहे.


Popular posts
*महासंस्कृती महोत्सव अंतर्गत 'मराठी बाणा' कार्यक्रमाला उदगीरकरांचा उस्फुर्त प्रतिसाद* ▪️क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन
Image
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी रस्त्यावर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
Image
15 फेब्रुवारी रोजी उदगीर येथे महाविकास आघाडीचा महामोर्चा
Image
केंद्रीय मंत्री रुपाला 29 जानेवारी रोजी उदगीरात उदगीरची अस्मिता असलेल्या दूध डेअरीची पाहणी करणार : खा. शृंगारे यांची माहिती
Image
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
Image