राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची बाधा

राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची बाधा


उदगीर : उदगीर मतदार संघाचे आमदार पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी रात्री त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.


खबरदारी म्हणून राज्यमंत्री संजय बनसोडे यांना मुंबईत एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राज्यमंत्री बनसोडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


गेल्या तीन महिन्यांपासून कोरोनाच्या काळामध्ये उदगीर मतदारसंघात व लातूर जिल्ह्यातील उद्भवलेल्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत असताना प्रत्येक कंटेनमेंट झोनमध्ये पाहाणी करणे, हॉस्पिटलची पाहणी करणे, व्यवस्थापन पाहणे, अधिकाऱ्यांच्या बैठका घेणे, या व अशा अनेक कामानिमित्त धावपळ करत होतो. मतदारसंघातील मंत्रालयात काही कामे प्रलंबित असल्यामुळे मागील पाच-सहा दिवसांपासून मुंबईमध्ये येऊन कामाचा पाठपुरावा करत असताना, अनावधानाने कुणाच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे मला काल सकाळी थोडासा ताप आणि घशामध्ये खवखव होत होती. त्यामुळे लागलीच हिंदुजा हॉस्पिटलमध्ये जाऊन मी कोरोना तपासणी केली. रात्री उशीरा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी तात्काळ मुबंई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. येथील सर्व टीम माझ्यावर लक्ष ठेवून उपचार करत आहेत.


 


मागील चार दिवसांमध्ये माझा अनेक लोकांशी संपर्क आला असल्यामुळे जे जे लोक माझ्या संपर्कात आले होते. त्या सर्वांना माझी विनंती आहे आपण स्वतः होम क्वारंटाइन व्हावे. उदगीर, लातूर,उस्मानाबाद येथे बैठका घेतल्या होत्या. तेथील सुद्धा अधिकारी व कार्यकर्ते यांनी पण होम क्वारंटाईन व्हावं व काही त्रास वाटल्यास तपासणी करून घ्यावी, अशी विनंती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी केली आहे.


आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन मतदार संघाच्या विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी पुन्हा हजर होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. 


 


 


Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image