आंतरभारतीच्या व्यासपिठावर गुडसूरकरांचा श्याम! १८रोजी प्रसारण:कुमारांसाठी मेजवानी

आंतरभारतीच्या व्यासपिठावर गुडसूरकरांचा श्याम!


१८रोजी प्रसारण:कुमारांसाठी मेजवानी


उदगीर : आंतरभारती पुणे आयोजित भारतीय ६४ कला उपक्रमांतर्गत कार्यक्रमात येथील नाट्यकलावंत धनंजय गुडसूरकर यांच्या हॕलो,मी श्याम बोलतोय या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.दि.१८जुलै रोजी शनिवारी संध्याकाळी ७.३० वा.आंतरभारतीच्या फेसबुक पेजवर होणाऱ्या या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


    साने गुरुजींच्या संकल्पनेतून साकारलेल्या आंतरभारती परिवाराने लाॕकडाऊनच्या काळात ६४ भारतीय कला हा उपक्रम आयोजित केला असून यामध्ये या सर्व कला क्षेत्रातील दिग्गज आपापली कला सादर करीत आहेत.या उपक्रमाच्या माध्यमातून ६४ कलांचा परिचय व दृढीकरण होत आहे.


    या उपक्रमाच्या बाराव्या सत्रात दि. १८ रोजी उदगीर येथील नाट्यकलावंत धनंजय गुडसूरकर हे आपल्या एकपात्री प्रयोगाच्या माध्यमातून आपली कला सादर करणार आहेत.जगभरात विविध भाषांतून प्रकाशित झालेल्या व मराठीत अगणित संख्येने प्रकाशित झालेल्या "श्यामची आई" या पुस्तकाचे हे नाट्यरुपांतर आहे.गुडसूरकर हे कृतीशील अध्यापक असून सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे.


    प्रत्येक घराने व घरातील प्रत्येकाने लाभ घ्यावा अशी ही कलाकृती आहे.याचा लाभ घेण्याचे आवाहन आंतरभारती पुणे चे डी.एस.कोरे व आंतरभारती परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.


टिप्पण्या
Popular posts
राष्ट्रपतींचा दौरा ना. संजय बनसोडे यांच्या नेतृत्वाला दिशा देणार...!
इमेज
माझं ठरलंय ....! : माजी खासदार सुधाकर शृंगारे
इमेज
*राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूच्या यांच्या हस्ते उदगीरच्या बुद्ध विहाराचे लोकार्पण* *क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
इमेज
डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर यांच्या व्यापाऱ्यांशी गाठीभेटी पदयात्रेद्वारे साधला संवाद
इमेज
उदगीरात श्री चे उत्साहात विसर्जन
इमेज