साहित्यिक सखीमंच उदगीरचा आई वरील ऑनलाईन कार्यक्रम
लाॅकडाऊन च्या काळात आई या विषयावर साहित्यिक सखीमंच उदगीरने आगळावेगळा कार्यक्रम ऑनलाइन लिखित साहित्य मेळा मोबाईल वर आयोजित केला होता. या व्हाट्सअप ग्रुप ने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात साहित्यातील विविध प्रकारात कथा, कविता ,लेख, ललित, चारोळी, पुस्तक परिचय असे एकूण 37 साहित्य आले. दुपारी 3 ते 5 या वेळात हा कार्यक्रम संपन्न झाला .अध्यक्ष होत्या सौ. अर्चनाताई नळगीरकर. उषाताई तोंडचिरकर यांनी सुरेल स्वागत गीत गायले. सूत्रसंचालन सौ.अश्विनी निवर्गी यांनी केले. आभार प्रदर्शन सुनंदा सरदार यांनी केले .प्रा.सौ.अश्विनी देशमुख यांनी तांत्रिक बाजू पूर्णपणे सांभाळली. अगदी व्यासपीठावर ज्याप्रमाणे कार्यक्रम होतो त्याच पद्धतीने हा ऑनलाईन कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये विविध ठिकाणी राहणा-या साहित्यिक महिलांनी सहभाग नोंदवला. पुणे ,मुंबई, औरंगाबाद ,लातूर ,वैराग, उदगीर, अंबाजोगाई येथील महिलांनीही यामध्ये सहभाग घेतला. यामध्ये सहभाग घेणाऱ्या साहित्यिक महिला होत्या, सायली कुलकर्णी, टेंकाळे मॅडम, सुरेखा कुलकर्णी, संजीवनी संदीकर, संध्या कुलकर्णी, सुनंदा सरदार, सुरेखा गुजलवार, उषाताई तोंडचिरकर, अंजली बनशेळकीकर, अँड. मीरा देवणीकर, कृतिका दासखेडकर, छाया दीक्षित, मंजिरी चाकुरकर, सुवर्णा कुलकर्णी, अश्विनी निवर्गी, मंजिरी चपळगावकर, जयश्री बिरादार, श्रुती कुलकर्णी , अनिता कुलकर्णी, प्रिया यशवंत कुलकर्णी ,सुनिता कुलकर्णी, प्रीती दुरुगकर, वंदना दीक्षित प्रतिभाताई बिरादार. या सर्वांनी सादरीकरण केले. या साहित्यिक सखी मंचच्या आयोजक टीम मधील सौ.अश्विनी निवर्गी ,प्रा.सौ.अश्विनी देशमुख ,सौ. अर्चना नळगीरकर, सुनंदा सरदार, उषाताई तोंडचिरकर यांनी हा अनोखा कार्यक्रम घडवून आणून, घरबसल्या सर्वांना त्याचा आनंद घेता यावा अशा पद्धतीने कार्यक्रम घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
addComments
टिप्पणी पोस्ट करा