पोस्ते पोदार लर्न स्कूल सीबीएसई इथे कारवॉ फाऊंडेशन कडून वृक्षलागवड
उदगीर: येथील नामांकित असलेल्या पोस्ते पोदार लर्न स्कूल मध्ये सामजिक कार्यात अग्रेसर असलेल्या कारवॉ फाऊंडेशन तर्फे 50 वृक्षांची लागवड करण्यात आली.
यावेळी तहसीलदार व्यंकटेश मुंढे, देवशेट्टे मामा, शाळेचे सचिव सूरज पोस्ते, शाळेचे प्रिन्सिपल सूर्यकांत चवळे, कारवॉ फाउंडेशनच्या अदिती पाटील, गूरूप्रसाद पांढरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज पर्यावरणाची हानी होत असल्याने दुष्काळ, कारोना सारखी संकटे आपल्या समोर उभी राहत आहेत.या संकटांचा सामना करायचा असेल तर निसर्ग समतोल असणे आवश्यक आहे.
नेहमीच शिक्षणा सोबत समाज आणि निसर्ग याला कायमच शाळेने महत्व दिले आहे. आणि वेळोवेळी विविध उपक्रम राबविले आहेत. यातूनच शहरातील कारवाँ फाऊंडेशन, कडून पोस्ते पोदार लर्न स्कूल येथे मियावाकी जंगल संकल्पेनेतून वृक्ष लागवड करण्यात आली.
यावेळी रामलिंग धानुरे, श्रीकांत पारसेवार, गौरवी पाटील, शिवानी बरगे, स्वर्णिका कडगे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेषराव बिरादार , मुबारक मुल्ला, वनिता सुगंधी, जशन डोळे, सावन जाधव, अतुल करखेलीकर, गजानन फुलारी, उमाकांत पाटील, ओमकार गांजुरे यांनी परिश्रम घेतले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा