संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक  बाबी सुरु ठेवण्यास परवानगी  

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक 


बाबी सुरु ठेवण्यास परवानगी


 


लातूर-जिल्हयात कोरोना विषाणूचा वाढत चाललेला प्रार्दुभाव व रुग्ण्संख्या विचारात घेता कोरोना विषाणुच्या संसर्गाची साखळी तोडण्याच्या दृष्टीकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्हयात दिनांक 15 जूलै 2020 ते दिनांक 30 जूलै 2020 पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार पारित केलेल्या संचारबंदी आदेशामध्ये सुधारणा करुन अपर जिल्हादंडाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी आदेश निर्गमित पुढील अत्यावश्यक बाबी सेवा मर्यादीत /स्वरुपात व निर्बधासह सुरु राहतील, असे नमूद केले आहे. 


सर्व ऑनलाईन सेवा पुरविणारे CSC नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या वेळेप्रमाणे सुरु राहतील. अत्यावश्यक सेवेतील संस्था (CSC, घरगुती गॅस वितरक, पेट्रोलपंप धारक इत्यादी ), यांना दैनिक व्यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्यवहारासाठी बँकेत ये-जा करणेसाठी व व्यवहार करणेसाठी परवानगी असेल. बँकेतील व्यवहारासाठी ये-जा करणाऱ्या व्यक्तीस संस्थेचा गणवेश अथवा ओळखपत्र किंवा आवश्यकतेनुसार दोन्ही बाबी बंधनकारक राहतील.


या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.