किफायतशीर दुग्ध व्यवसाय विषयावरील पाच दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण संपन्न  

किफायतशीर दुग्ध व्यवसाय विषयावरील पाच दिवसीय ऑनलाइन प्रशिक्षण संपन्न    पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर तर्फे किफायतशीर दुग्ध व्यवसाय विषयावरील पाच दिवसीय ऑनलाईन शेतकरी प्रशिक्षण दिनांक 20 ते 24 जुलै 2020 दरम्यान मा. सहयोगी अधिष्ठाता, डॉ. रावजी मुगळे यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. सदर प्रशिक्षण गूगल मीट द्वारे घेण्यात आले. महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यातून 44 प्रशिक्षणार्थी या प्रशिक्षणात सहभागी झाले होते. या प्रशिक्षणात दुग्धविषयासंबंधित एकूण 11 व्याख्याने व प्रश्र्नोत्तरे सत्रांचा समावेश करण्यात आला होता. या प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी उपसंचालक संशोधन, डॉ. विश्वास साळुंके आणि प्रशिक्षण समन्वयक डॉ. प्रफुल्ल कुमार पाटील अथक परिश्रम घेतले. सर्व सहभागी प्रशिक्षणार्थीनी उत्तम व परिपूर्ण ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केल्याबद्दल आभार मानले.