यशवंत वसतिगृहात चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या हस्ते वृक्षारोपण. 

यशवंत वसतिगृहात चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या हस्ते वृक्षारोपण.


 


उदगीर : तालुक्यातील एकुर्का रोड येथील यशवंत वसतिगृहातील परिसरात शुक्रवारी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 


वृक्षारोपण करण्यासाठी मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांना बोलविले जाते, परंतू या यशवंत वसतिगृहात चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांच्या हस्ते वृक्षारोपण करत त्यांचा सन्मान करण्यात आला. यात स्वयंपाकीन सुशिलाबाई सुर्यवंशी, आशा कांबळे, मदतनीस नामंत पाटील, सेवक अशोक राठोड, संजय राठोड, परिचर  उस्मान पठाण यांचा समावेश आहे. यावेळी संस्था सचिव प्राचार्य प्रमोद चौधरी, पर्यवेक्षक सिध्दार्थ बोडके, संस्था सदस्य प्रा. एम. व्ही. स्वामी, प्रा. बी. एस. बाबळसूरे, प्रा. एन. आर. लांजे, शशिकांत जाधव, बी. एन. खंदाडे, बी. जी. कानपुर्णे, रसूल पठाण, निलेश जाधव,  प्रा. के. डी. मुडपे, पी. जी. बेंबडे, सचिन वळसने, प्रदीप केंद्र, संजय जाधव, किरण हाळीघोंगडे, अमर जाधव, वसतिगृह अधिक्षक संदीप जाधव यांची उपस्थिती होती. 


टिप्पण्या
Popular posts
येणाऱ्या पिढीच्या भविष्याचा विचार करून महायुतीच्या पाठीशी रहा - आ.संभाजीराव पाटील निलंगेकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उदगीरात 'रश्मीरथ' चे लोकार्पण: श्रीमंत व्यापारी गणेश मंडळाचा उपक्रम
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या उदगीर शहराध्यक्षपदी सरोजा वारकरे
इमेज