लातूर शहरात ५, उदगीर-देवणी १, चाकूर ३, अहमदपूर २ कोरोना पॉझीटीव्ह

लातूर शहरात ५, उदगीर-देवणी १, चाकूर ३, अहमदपूर २ कोरोना पॉझीटीव्ह


 


 


लातूर : जिल्ह्यात १० जुलै रोजी घेण्यात आलेल्या कोरोना आजाराच्या २७५ स्वॅब नमुन्यांपैकी २१७ अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर १२ पॉझिटिव्ह आहेत. रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाकडून हा अहवाल प्राप्त झाला.


 


एकूण अहवालात लातूर शहरातील ५, देवणी १, चाकूर ३, अहमदपूर २ व उदगीर येथील एका पॉझिटिव्ह रुग्णाचा समावेश आहे.


 


विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ६३ व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. पैकी ४० निगेटिव्ह, तर ४ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत.


 


९ जुलै रोजी ४३ व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते. पैकी १३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, १६ व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आहेत,


 


दरम्यान, सदरील माहिती विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ. विजय चिंचोलकर यांनी दिली.