लसाकमच्या प्रदेश उपाध्यक्ष पदी मनोहर डाकरे


निलंगा- क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ ( लसाकम) च्या प्रदेश उपाध्यक्ष पदी मनोहर डाकरे , यांची निवड झाली आहे. नुकतेच झालेल्या झूम मीटिंग मध्ये ही निवड करण्यात आली आहे. 
मनोहर डाकरे हे गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत, लहू-फुले -शाहू - बाबासाहेब -अण्णाभाऊ यांच्या विचाराची प्रेरणा घेऊन समाज प्रबोधन चे ही कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र कार्यकर्त्याच्या बैठीकित त्यांची प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. या कार्यकारणी मधील इतर पदाधिकाऱ्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष:- बालाजी थोटवे नांदेड,. महासचिव राजकुमार नामवाड, लातूर, कार्याध्यक्ष प्रा डॉ सोमनाथ कदम, कणकवली, प्रदेश उपाध्यक्ष:- विलास मानवतकर बुलढाणा, ललित अंभोरे अकोला, कोषाध्यक्ष्य पी. एल दाडेराव मुखेड, प्रदेश सचिव :- बी. आर . शिंदे मुंबई,.
दिगंबर मण्यार, औरंगाबाद, प्रा. डॉ नरेंद्र गायकवाड, रत्नागिरी, राज्य प्र वक्ते:- प्रा डॉ मारोती कसाब उदगीर, अरुण कांबळे, औरंगाबाद यांचा समावेश आहे.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन
Image
मतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*
Image