भाजपाच्या औरंगाबाद प्रभारीपदी संभाजीराव पाटील यांची नियुक्ती

भाजपाच्या औरंगाबाद प्रभारीपदी संभाजीराव पाटील यांची नियुक्ती


निलंगा :निलंगा विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यशील नेतृत्व,भारतीय जनता पार्टीत संघर्षहीन नेता म्हणून ओळख असलेले लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर यांची पक्षाने औरंगाबाद या जिल्ह्यासाठी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. माजी मुख्यमंञी तथा आ.विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती झाली आहे.


निलंगा तालुक्यातील विकासपायलट म्हणून माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पक्षाच्या आपल्या कार्यकाळात पक्षासाठी अहोरात्र काम करून त्यांनी लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठे योगदान दिलेले आहे.


त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला आपलेसे करून प्रथम त्यांनी


लातूर महानगरपालिका सत्ता काबिज केली, जिल्हा परिषद लातूर, जिल्ह्यातील नगरपरिषदा, पंचायत समित्या असो वा गावस्तरावरील ग्रामपंचायती असोत अनेक नियोजनबध्द आखणी करून कार्यकर्त्यास बळ देऊन सत्तांतर केले. पण, मध्यंतरीच्या काळात आपल्या स्वकियाने महानगरपालिकेत काँग्रेसला मदतीचा हात देऊन सत्तांतर झाले. त्यावेळेस माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी ” हमें तो अपनोंने लुटा…गैरो में कहां दम था, मेरी किश्ती वहां डूबी जहां पानी कम था “असे विधान करून मतभेद जरी असले तरी मनभेद नाहीत हे त्यावेळेस सांगितले होते.अशा अनेक संघर्षातून मार्ग काढून पक्षासाढी अहोराञ प्रयत्न करून सत्तांतर केले आणि आजतागायत पक्षश्रेष्ठींने एक मोढी जबाबदारी औरंगाबाद प्रभारी म्हणून नियुक्ती केली आणि पुन्हा निलंगा तालुक्यातील कार्यकत्त्यांचा उत्साह वाढला आहे.


आ. संभाजीराव पाटील निलंगेकर हे माजी मुख्यमंत्री तथा आ.विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून पक्षात त्यांच्याकडे पाहिले जाते. आणि त्यांनी कामातून पक्षाला पोचपावतीच दिल्याने हे फळ असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत.


, भारतीय जनता पार्टीने अनेक पदावर त्यांची पदौन्नती करून संघटन वाढवण्यात निलंगेकरांचा मोढा हात आहे त्याच धरतीवर औरंगाबाद या मोठ्या जिल्ह्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image