ऑनलाइन गायन स्पर्धेत श्रावणी गुडसुरकर प्रथम *लॉयनेस क्लबचा लॉकडाऊनमधील उपक्रम*

ऑनलाइन गायन स्पर्धेत श्रावणी गुडसुरकर प्रथम


*लॉयनेस क्लबचा लॉकडाऊनमधील उपक्रम*


उदगीर: येथील लॉयनेस क्लब उदगीरच्या वतीने दि. 25 जुलै रोजी महिला व युवतींसाठी ‘सावन के गीत’ ही गाण्यांची online स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत श्रावणी गुडसुरकर ही प्रथम विजेती ठरली आहे.


या स्पर्धेत २२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून स्पर्धेत संगीता मोरे द्वितीय तर गार्गी महाराज तृतीय आली असून उत्तेजनार्थ बक्षीस अंबिका पंदिलवार याना जाहीर झाले आहे.


विजेत्यांचा सन्मान व पारितोषिक वितरण lockdown नंतर करण्यात येणार असल्याची माहिती लॉयनेस क्लबच्या अध्यक्षा लाय. चंद्रकला बिरादार यांनी दिली.


या स्पर्धेसाठी लाय. सुनिता पंडित, प्रेमलता नळगिरे ,लाय.शोभा कोटलवार , लाय.चारूशीला पाटील, लाय सुनेजा मठपती, आय.बेबीसरोजा बेलुरे, लाय सुषमा मुळे, लाय.स्वाती देबडवार, लाय सुनिता नेलवाडकर यांनी पुढाकार घेतला.


टिप्पण्या
Popular posts
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
लातूर जिल्हयात 15 जूलै ते 30 जूलै 2020 पर्यंत लॉकडाऊन राहणार  : संचार बंदी कालावधीत विविध आस्थापना सेवासंदर्भात नियमावली जाहीर
'प्रत्येकाने आपापला गड सांभाळावा; विजयाची मोहीम फत्ते करू' - डॉ.अर्चनाताई पाटील चाकुरकर
इमेज
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
मरेपर्यंत २४ तास सेवेत राहीन - अभय साळुंके
इमेज