काठावरील शेतकरी,वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे

काठावरील शेतकरी,वस्ती करुन राहिलेल्या नागरिकांनी सतर्क रहावे


लातूर : जिल्हयातील मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नदीवरील बॅरेजेसच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area ) सातत्याने पर्जन्यवृष्टी होत असल्याने येवा (Inflow) असाचा चालू राहिला तर केंव्हाही बॅरेजेस निर्धारीत पातळीस भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे बॅरेजेसमध्ये येणारा येवा बॅरेजमधून त्या त्या नदीपात्रात सोडावा लागणार आहे.


मांजरा, तेरणा, तावरजा व रेणा नदीकाठावरील शेतकरी किंवा नदीकाठी वस्ती करुन राहिलेले नागरीक यांनी सावध रहावे जेणे करुन जिवीत व वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता तथा जिल्हा पूर समन्वय अधिकारी लातूर पाटबंधारे विभाग क्र.-1 लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.