अभिजित औटे मित्रमंडळाच्या वतीने वृक्षसंवर्धनासाठी स्पर्धेचे आयोजन

अभिजित औटे मित्रमंडळाच्या वतीने वृक्षसंवर्धनासाठी स्पर्धेचे आयोजन


उदगीर : येथील लॉयनेस क्लब उदगीर गोल्ड , आणि अभिजीत अशोकराव औटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वनसंवर्धन दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी व विद्यार्थिनी वयोगट 05 वर्ष ते 10 वर्ष साठी व्रुक्षारोपणातुन व्रुक्षसंवर्धन ही स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.


स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी दि. 23 जुलै रोजी सकाळी ठिक 11.00 ते संध्याकाळी 05.00 वाजे पर्यंत एक झाड लावुन लावलेल्या झाडा सोबतचा फोटो, आपलं पुर्ण नाव मोबाईल नंबर घरचा पत्ता यासोबत प्रोजेक्ट चेअरमन लॉयनेस क्लब उदगीर गोल्डच्या उपाध्यक्ष सौ. मंजुषा कुलकर्णी - 9881692437 , सचिव सौ.दिपाली औटे -8600816060 या नंबर वर पाठवावे. सदरील स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक व प्रोत्साहन पर बक्षीस लॉकडाऊन संपल्यानंतर देण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व्रुक्षारोपण करून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन


लॉयनेस क्लब गोल्डच्या अध्यक्षा संगीता नेत्रगावे, अभिजीत ओटे मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिजीत औटे, लॉयनेस क्लब गोल्ड च्या कोषाध्यक्षा वर्षारानी धावारे यांच्यासह पदाधिकाऱ्यानी केले आहे.


Popular posts
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील बारावीच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम.
Image
*महाराष्ट्र महाविद्यालयात कृषी दिनानिमित्त वृक्षारोपन
Image
मतदार यादीतील नाव वगळणे, समाविष्ठ करणे व दुरुस्ती करुन घेण्याचे आवाहन
उदगीर शहरामध्ये पर्यावरण,आरोग्य संवर्धन आणि प्रदूषमुक्तीसाठी आयोजित भव्य सायकल रलीमध्ये उदगीरकरांनी सहभागी व्हावे मुख्याधिकारी भारत राठोड
*राज्यमंत्री बनसोडे यांची उदगिरकरांना वाढदिवसाची भेट* *तालुक्यात नागरिकांच्या सोयीसाठी तलाठी भवन व मंडळ अधिकाऱ्यांचे कार्यालयाला मंजुरी*
Image