रक्षाबंधन नाते अतूट बहीण भावाचे

रक्षाबंधन नाते अतूट बहीण भावाचे


    रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधुन भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते जगातील सर्व नात्यांमध्ये बहीण भावाचे प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असते.


    भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्यासाठी एखादा तरी सण आहे. त्यातील बहीण भावाचा महत्त्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनाचा सण म्हणजे दृष्टी परिवर्तनाचा सण बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधताच भावाची दृष्टी बदलते. समाजात आपली बहीण ताठ मानाने वागावी म्हणुन तिच्या रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतः कडे घेतो. बहीण राखी बांधण्यापूर्वी भावाच्या कपाळावर टिळा लावते ते केवळ भावाच्या कपाळाची पूजा करण्यासाठी नाही तर त्याचे विचार आणि बुद्धीवरील विश्वाचे दर्शन आहे. रक्षाबंधन सण हा भावाने राखी बांधुन आपले कर्तव्य पाडावीत याची सुद्धा जाणीव करून देतो.


    "चंद्राला म्हणतात चंदन


    देवाला करतात वंदन


  भाऊ बहिणीचे प्रेम म्हणजे रक्षाबंधन"


    आपला भाऊ राया सुखी असावा त्यांने आपल्या आई वडिलांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करावा असे प्रत्येक विवाहीत बहिणीला वाटत असते. तर आपली बहीण खुप शिकावी मोठेपणी चांगल्या घरी जावी आपल्या बहिणीला कोणताही त्रास होऊ नये असे प्रत्येक भावाला बहिणीबद्दल वाटते. बहीण आपल्या भावाला सुख, शांती लाभो अशी देवाजवळ प्रार्थना करत असते.     


      तर भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणासाठी राखी बांधुन घेतो. या दिवशी भाऊ न विसरता आपल्या बहिणीला भेट वस्तु देऊन खुश करतो. या दिवशी श्रावणी करणे हा प्रकार सुद्धा असतो. श्रावणी करणे म्हणजे मन शुद्ध करणे. 


              कोळी लोक नारळी पौर्णिमेचा सण साजरा करतात या काळात मासे मारीचे काम पूर्णपणे बंद पडते. बोटींना अपघात होण्याची भिती असते म्हणून कोळी लोक पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची पूजा करतात व समुद्राला नारळ अर्पण करून आपल्या बोटी समुद्रात सोडतात व बहीण भावाचे नाते दृढ करतात व समुद्रावर कोळी नृत्य सादर करून हा सण साजरा करतात. तसेच उत्तरेकडील लोकांना समुद्रकिनारा नसल्यामुळे तेथे पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन हा सण फार मोठ्या उत्साहात साजरा करतात. स्त्री पुरुष लोकगीत व लोकनृत्य करून हा सण साजरा करतात.


                     पुरातन काळापासून ही प्रथा चालत आलेली आहे. श्रीकृष्णाच्या करंगळीला जखम होऊन त्यातून रक्त येते हे द्रौपदीने पाहताक्षणी झटकन आपल्या अंगावरचा भरजरी शालू फाडून त्याची पट्टी बांधली कदाचीत तेंव्हा पासूनच रक्षाबंधन हा सण अस्तित्वात आला असावा. श्रीकृष्ण- द्रौपदी ही जोडी बहीण भावाच्या प्रेमाचे आदर्श उदाहरण आहे. श्रीकृष्णाने कौरव सभेत वस्त्र पुरवठा करून द्रौपदी चे रक्षण केले व भावाचे कर्तव्य पार पाडले. कोणतीही स्त्री असो तिला आपल्या भावाचे अतिशय कौतुक असते. सासुरवासीनीला तर आपला भाऊ राया आपल्या घरी आला की काय करू नी काय नको असे होते. एक भाऊ जेंव्हा बहिणीला भेटतो तेंव्हा आ आख्खे माहेर भेटायला आले असे बहिणीला वाटते. 


     राखी बांधण्याचा अर्थ आपण त्या व्यक्तिच्या प्रेमरुपी बंधनात स्वतःला वाहून घेऊन तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारतो. राखी बंधनाच्या या सणातुण मित्रत्व व स्नेह वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे. 


   "रागीट प्रेम अन 


    गोड भांडण 


    बंधू भगिनीचे आगळे हे बंधन 


    बहिण जीवनातील अक्षय 


   समजावे ते आपणास रक्षाबंधन 


  वेड्या मायेचे अन प्रेमाचे क्षण 


  ताई दादांचा हा अतिशय प्रिय सण 


बांधुन धागा ती करते औक्षण 


तो सदैव करण्या रक्षण 


तो सदैव करण्या रक्षण" 


       राखीचा धागा हा नुसता धागा नसुन ते एक शील स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारे बंधन आहे या छोट्याश्या धाग्याने अनेक मने जुळून येतात त्यांच्या भावनांना ओलावे येतात आणि मन भरून येते. असाच बहीण भावांना एकत्र जोडणारा रक्षाबंधन नाते अतूट बहीण भावाचे... 


 


सौ. अनिता विठ्ठलराव शानेवार 


सहशिक्षक: सरदार वल्लभभाई पटेल प्राथमिक विद्यालय उदगीर......


Popular posts
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करु : प्रा. डॉ. सुधीर जगताप
Image
माजी पाणीपुरवठा राज्यमंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडुन चोंडी तलावाची पाहणी
Image
राष्ट्रपतीपदी मुर्मु यांच्या निवडीचे उदगीरात भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून जल्लोष
Image
ग्रंथ दिंडी ही संस्कारमय व्हावी : नागराळकर साहित्य संमेलनानिमित्त ग्रंथ दिंडी नियोजनासाठी मुख्याध्यापकांची बैठक
Image
गोपनीयतेचा भंग करणाऱ्यांवर कार्यवाही होणार का? उदगीर: कोरोना विषाणूचा वरचेवर प्रादुर्भाव वाढत चालत असताना यासंदर्भातील कोणतेही वृत्त प्रसारमाध्यमानी जिल्हा माहिती कार्यालयाकडून अधिकृत माहिती आल्याशिवाय प्रसिद्ध करू नये अन्यथा कार्यवाहीचा बडगा उगरण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांकडून एका पत्राद्वारे देण्यात आला आहे. मात्र कोरोनाबधित रुग्णांची यादी संबंधित विभागाकडून बाहेर कशी व्हायरल होत आहे यावर कोणाचे नियंत्रण नाही का? असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत गोपनीयतेचा भंग करणाऱ्याविरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. देशभरात कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. राज्यात पुणे मुंबई पुरता मर्यादित असलेल्या या विषाणूंने राज्याच्या ग्रामीण भागात आपले पाय पसरले आहे. या आजाराचे रुग्ण अगदी सीमेवरच्या उस्मानाबाद, लातूरमध्येही आढळून येत असल्याने प्रशासन जबाबदारीने काम करीत आहे. तर दुसरीकडे नागरिकामध्ये भयाचे वातावरण निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर एखाद्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाली असेल तर त्याचे नाव गोपनीय ठेवून त्याच्यावर विलगीकरण कक्षात उपचार करण्यात येत आहेत. शिवाय त्या रुग्णाबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात येते. अलीकडे प्रसारमाध्यमे गतिमान झाल्यामुळे एखाद्या रुग्णाची माहिती मिळाल्यास तात्काळ व्हायरल करण्याचे काम अतिउत्साही मंडळीकडून होत आहे. यामुळे नागरिकामध्ये आणखी घबराटीचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना भीती वाटू नये यासाठी अशा प्रकारे सोशल मीडियावर माहिती टाकल्यास व विविध माध्यमातून वृत्त प्रसारित झाल्यास कार्यवाही करण्याचा इशारा लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी एका पत्राद्वारे दिला आहे. असे असताना गेल्या दोन तीन दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील विविध शहरातील कोरोना संशयितांची तपासणी केल्यानंतर त्यांचा पॉझिटिव्ह अथवा निगेटीव्ह जो काही अहवाल असेल तो अहवाल गोपनीय न ठेवता संबंधित यंत्रणेकडून बाहेर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेला हा अहवाल त्यानंतर विविध व्हाट्सअपचा ग्रुप मधून काही अतिउत्साही मंडळींकडून फिरवताना दिसतो. याचा परिणाम समाजावर होताना दिसत आहे. सदरील अहवालात कोणाची नावे आहेत हे जाहीर होत असल्याने ज्या गावातील सदरील रुग्ण आहे तेथे संशयाचे वातवरण निर्माण होण्याबरोबरच जनतेमध्ये भीतीची भावना निर्माण होत आहे. हा अहवाल गोपनीय ठेवण्याची गरज असताना हा अहवाल बाहेर कसा आला? याची चौकशी होणे गरजेचे आहे? ही यादी बाहेर व्हायरल करणाऱ्या संबंधिता विरोधात शासन कार्यवाही करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
Image