उदगीर पालिकेच्या वतीने अग्गी बसवन्ना परिसरात वृक्षारोपण

उदगीर पालिकेच्या वतीने अग्गी बसवन्ना परिसरात वृक्षारोपण


 


उदगीर : येथील नगर परिषदेच्या वतीने शहरातील अग्गी बसवन्ना परिसर व शासकीय डी. एड. कॉलेज समोर वृक्षारोपण करण्यात आले.


उदगीर नगर पालिकेच्या वतीने शहरात वृक्षारोपणाची मोहीम मोठ्या स्वरूपात राबविण्यात येत आहे. या मोहिमेचाच एक भाग म्हणून सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी अग्गी बसवन्ना परिसर व शासकीय डी. एड. कॉलेज या परिसरात आकाशनीम या जातीची २०० झाडे लावण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी भारत राठोड, वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रकांत वैजापूरे, रमेश अंबरखाने, नगरसेवक मंजूरखान पठाण, राजकुमार भालेराव, साईनाथ चिमेगावे, राजकुमार बिरादार, शेख इब्राहिम देवर्जनकर, रविंद्र हसरगुंडे, विक्रम हलकीकर, स्वच्छता निरीक्षक सय्यद सलीम उपस्थित होते.


Popular posts
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
हैदराबाद-बीदर इंटरसिटी उदगीरपर्यंत करा दक्षिण मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची उदगीर रेल्वेस्थानकास भेट: शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा
Image
माझे आदर्श गुरू...🙏
Image
माझी वसुंधरा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांसाठी रंगभरण व निबंध स्पर्धा. उदगीर नगर परिषद व अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा उपक्रम.
*आचारसंहितेचे उल्लंघन होतेय ? मग, सीव्हिजिल ॲपवर तक्रार करा* · पहिल्या १०० मिनिटाच्या आत मिळतो प्रतिसाद
Image