*विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक राख्या*   *श्री पांडूरंग विद्यालयातील ऑनलाइन उपक्रम*

*विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक राख्या*


 


*श्री पांडूरंग विद्यालयातील ऑनलाइन उपक्रम*


उदगीर(प्रतिनिधी)


             उदगीर, तालुक्यातील श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथील कलाशिक्षक- नादरगे चंद्रदीप यांच्या मार्गदर्शनातून सांगितलेल्या कृतीनुसार जाड पुठ्ठा(खपट) ,कागद, रंग,ब्रश,


फेविकॉल,कैंची,उलनचा दोरा,धान्य, मोरपीस, झाडांची पाने,बिया,तुळशी पासून बनलेल्या माळेच्या मणी ईत्यादी साधनांचा वापर करून ऑनलाइन शिक्षण पद्धतीने व्हाट्सअप्प ग्रुपद्वारे रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक राख्या बनवल्या.


          रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. जगातील नात्यामध्ये बहीण भावाचे प्रेम निस्वार्थ आणि पवित्र असते. या रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक भाऊ बहिणीला जीवनभर तिचे रक्षण व 


मदत करण्याचे वचन देत असतो.


        रक्षाबंधनाच्या निमित्ताने पर्यावरणपूरक बनविलेल्या या राख्या तुटल्यानंतर मातीत अथवा कुंडीत टाकल्यास त्यातून सुंदर-फुलझाडाचे किंवा फळझाडांचे रोपटे बनतील.


निश्चितच या पर्यावरणपूरक राख्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि त्यातूनच पर्यावरणाची शोभा वाढेल. याच उद्देशाने या राख्या बनविल्या आहेत. राख्या बनविलेल्या विद्यार्थ्यांची नावे:- कांबळे प्रज्ञा अण्णाराव, केसगीरे सुदर्शन परशुराम, केसगीरे काशीनाथ परशुराम, सुरनर ज्ञानेश्वरी वामन, मोरे लक्ष्मी माधव, सुरनर स्वाती गणपत, सुरनर शिवराज नारायण, मामडगे सायली विठ्ठल, हाके राधा दयानंद, कुंजटवाड ज्ञानेश्वर रमाकांत, सुरनर तुकाराम जनार्दन, चलवाड निकिता बालाजी, कुंजटवाड अस्मिता रमाकांत आशा अनेक विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकाराच्या पर्यावरणपूरक सुंदर राख्या बनविलेल्या पाहून विद्यालयाचे सचिव- विनायकरावजी बेंबडे साहेब,पंचायत समिती,उदगीरचे माजी उपसभापती- रामदासजी बेंबडे साहेब, मुख्याध्यापक- नादरगे एस. व्ही. व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच गावातील माता-पालक यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून गोड कौतुक करून अभिनंदन केले.


Popular posts
उदगीर - जळकोट विधानसभा काँग्रेस पक्षांला सोडवून घ्यावे... माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडे साकडे..
Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत उदगीर येथील बौद्ध विहाराचे 30 जुलै रोजी होणार उद्घाटन क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला पूर्वतयारीचा आढावा
Image
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी काँग्रेस आक्रमक, शासनाला निवेदन
Image
प्रामाणिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करणार : माजी आमदार सुधाकर भालेराव
Image
विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आक्रमक उदगीर मतदार संघ महायुतीमध्ये भाजपला सोडवून घेण्यासाठी कार्यकर्ते आग्रही