हरित वसुंधरा ग्रुपचा उपक्रम: ४१ जण सहभागी: रांगोळी स्पर्धेत शोभा बिरादार प्रथम

हरित वसुंधरा ग्रुपचा उपक्रम: ४१ जण सहभागी


रांगोळी स्पर्धेत शोभा बिरादार प्रथम


उदगीर : येथील पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या हरित वसुंधरा या ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून शोभा बिरादार यांना प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे.


हरित वसुंधरा या ग्रुपच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी रांगोळी काढण्याची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ४१ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. 


या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून प्रथम विजेत्या : शोभा बिरादार, द्वितीय: अंजली मुक्कावार, तृतीय : रश्मी सूर्यवंशी व उत्तेजनार्थ: सुनीता पाटील हे विजेते ठरले आहेत. पारितोषिकाचे स्वरूप प्रथम ऍड. दत्ताजी पाटील यांच्या वतीने एक हजार रुपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय व्ही.एस. कुलकर्णी यांच्या वतीने ७५० रुपये रोख व प्रमाणपत्र, तृतीय ज्ञानोबा कोटलवार यांच्या वतीने ५५१ रुपये रोख व प्रमाणपत्र व उत्तेजनार्थ महादेव बिरादार यांच्या वतीने २५१ रुपये रोख व प्रमाणपत्र असे स्वरूप आहे.


या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून अर्चना नळगिरकर व मीनाक्षी स्वामी यांनी काम पाहिले. या स्पर्धेसाठी हरित वसुंधरा ग्रुपचे शोभा कोटलवार, चंद्रकला बिरादार, व्ही. एस. कुलकर्णी, विक्रम हलकीकर, सुनीता पंडित, सुरेखा कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला.