माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांचे निधन

माजी मुख्यमंत्री डॉ. निलंगेकर यांचे निधन


निलंगा:(प्रतिनिधी) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस चे ज्येष्ठ नेते डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले.काही दिवसांपूर्वीच त्यांना कोरोनचा संसर्ग झाला होता त्यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकर्ती बरी झाल्याने नुकतेच त्यांना घरी पाठवण्यात आले होते. वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोनाला हरवणारा योद्धासमजल्या जाणाऱ्या निलंगेकर यांनी मंगळवारी पहाटे २:१५ च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.


 


निलंगा विधानसभा मतदारसंघाचे सर्वाधिक काळ आमदार, निलंगा तालुक्यात शैक्षणिक गंगा आणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही, तळागाळातील जनतेचे कैवारी ,राजकारणातील निष्कलंक हिरा अशी ओळख असलेले डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी मंगळवारी पहाटे २:१५ च्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे अनेक सामान्य माणसा देव आज हरवला आहे. खऱ्या अर्थाने निलंगा तालुका, लातूर जिल्हा पोरका झाला. कधीही भरून न निघणारी उणीव निर्माण झाली. त्यांच्यावर निलंगा येथे अंतीमसंस्कार करण्यात येणार आहे.


 


 


टिप्पण्या
Popular posts
विरोधकांच्या अपप्रचाराला बळी पडू नका - डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचे आवाहन
इमेज
उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तीन वेळा होणार तपासणी*
राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आणा : खा. शरद पवार यांचे उदगीरच्या जाहीर सभेत आवाहन
इमेज
उदगीर रोटरी क्लबच्या वतीने करिअर फेस्टिवल चे आयोजन
डॉ.अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ शनिवारी महायुतीची संवाद यात्रा
इमेज